मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Evening Snacks मध्ये बनवा मटर पॅटीज, टेस्टी आहे हिरव्या वाटाण्याची रेसिपी

Evening Snacks मध्ये बनवा मटर पॅटीज, टेस्टी आहे हिरव्या वाटाण्याची रेसिपी

Jan 28, 2024 06:34 PM IST

Matar Patties Recipe: हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात हिरवे वाटाणे मिळतात. या हिरव्या वाटाण्यापासून तुम्ही टेस्टी पॅटीज बनवू शकता. ही रेसिपी चहासोबत खायला टेस्टी लागते.

मटर पॅटीज
मटर पॅटीज (freepik)

Fresh Green Peas Patties Recipe: हिवाळ्यात ताजे हिरवे वाटाणे मुबलक प्रमाणात मिळतात. घरीही त्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. तुम्ही कचोरी, भाज्या आणि तळलेले मटार बरेचदा खाल्ले असतील. यावेळी गरमागरम मटार पॅटीज बनवा. याची चव लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल. संध्याकाळच्या वेळी नाश्त्यासाठी हे पॅटीज खायला खूप चांगले लागतात. चहासोबत याची चव आणखी वाढते. चला तर मग जाणून घेऊया मटर पॅटीज कसे बनवायचे.

मटर पॅटीज बनवण्यासाठी साहित्य

- १ वाटी हिरवे वाटाणे

ट्रेंडिंग न्यूज

- ३-४ उकडलेले बटाटे

- अर्धी वाटी किसलेले ताजे खोबरे

- २ वाट्या ब्रेड क्रम्ब्स

- २ चमचे पांढरे तीळ

- १२-१५ काजू

- २ चमचे मनुके

- ३ इंच आल्याचा तुकडा

- २-३ हिरव्या मिरच्या

- ८-१० पाने कढीपत्ता

- बारीक चिरलेले कोथिंबीर

- अर्धा चमचा गरम मसाला

- २ चमचे तेल

- १ चमचा मोहरी

- २ चिमूटभर हिंग

- चिमूटभर साखर

- लिंबाचा रस

मटर पॅटीज बनवण्याची पद्धत

हिरव्या वाटाण्याचे पॅटीज बनवण्यासाठी प्रथम वाटाणे, आले, हिरवी मिरची आणि कढीपत्ता एकत्र करून पेस्ट बनवा. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी तडतडून घ्या. पांढरे तीळ, काजू आणि मनुका घालून भाजून घ्या. मग वाटाणे घालून भाजून घ्या. त्यात हिंग, किसलेले ताजे खोबरे, २ चिमूट साखर, चवीनुसार मीठ, गरम मसाला घालून मिक्स करून भाजून घ्या. शेवटी चांगले परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. दोन ते तीन उकडलेले बटाटे किसून घ्या. त्यात ब्रेड क्रम्ब्स, गरम मसाला, मीठ घालून मळून घ्या. आता या बटाट्याचे मिश्रणचा गोळा बनवून त्यात वाटाण्याचे सारण भरा. वरून ब्रेड क्रम्ब्स लावा आणि मध्यम आचेवर तेलात तळा. तुमचे पॅटीस तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.

WhatsApp channel