मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: कोरियन मुलींसारखा चमकणारा चेहरा हवाय? आठवड्यातून दोनदा हे करा!

Skin Care: कोरियन मुलींसारखा चमकणारा चेहरा हवाय? आठवड्यातून दोनदा हे करा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 13, 2024 04:32 PM IST

Korean beauty tips: आम्ही तुम्हाला अशा पदार्थाबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या त्वचेसाठी रामबाण उपाय ठरू शकतो.

how to make Flaxseeds Face Pack
how to make Flaxseeds Face Pack (freepik)

Flaxseeds Face Pack: सध्या कोरियन स्किन केअरची (skin care) चर्चा आहे. आजकाल अनेकांना कोरियन मुलींसारखी चमकणारी त्वचा मिळवण्याची इच्छा असते. ही इच्छा लोकांमध्ये वाढत जात आहे. प्रत्येकाला त्यांच्यासारखी क्लिअर आणि काचेची त्वचा हवी असते. यासाठी आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वचा एका आठवड्यात डागरहित आणि चमकदार दिसेल. यासाठी तुम्ही जवसाच्या बिया वापरू शकता. जवसाच्या बियाला मिक्स करून तुम्ही फेसपॅक बनवू शकता. हे फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी रामबाण उपाय ठरू शकतो. चला जाणून घेऊयात हा उपयाबद्दल..

ट्रेंडिंग न्यूज

कसा बनवायचा हा फेसपॅक?

> सर्वप्रथम जवसाच्या बिया बारीक करा. आता या पावडरमध्ये मध, एलोवेरा जेल आणि गुलाब पाणी घाला. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

> याशिवाय तुम्ही जवसाच्या बियांचा फेस पॅक वेगळ्या पद्धतीने बनवू शकता. यासाठी अर्धा कप पाणी आणि २ चमचे जवसाच्या बिया एकत्र करून उकळा. नंतर ३ ते ४ तास झाकून ठेवा. ते घट्ट जेल बनल्यावर चेहऱ्यावर लावा. एक थर सुकल्यावर दुसरा थर लावा. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर ४ थर लावा. नंतर त्वचा कोरडी झाल्यावर धुवा. यामुळे त्वचा घट्ट होते.

> यासोबत त्वचा डागरहित करण्यासाठी जवसाच्या बियांच्या पावडरमध्ये हळद आणि पाणी घालून पॅक तयार करा. ते त्वचेवर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. हे त्वचा घट्ट करण्याचेही काम करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग