Flax Seeds Chutney: आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जवसाची चटणी, बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Flax Seeds Chutney: आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जवसाची चटणी, बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

Flax Seeds Chutney: आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जवसाची चटणी, बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

Jul 17, 2024 08:19 PM IST

Chutney Recipe: जवसाची चटणी खाण्यास खूप चविष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. जाणून घ्या जवसाच्या चटणीची रेसिपी

जवसाची चटणी
जवसाची चटणी

Flax Seeds Chutney Recipe: ऋतू कोणताही असो जेवणासोबत सर्व्ह केलेली चटणी जेवणाची चव वाढवते. मात्र भारतीय स्वयंपाकघरात ऋतूनुसार अनेक प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. पण काही चटण्या या बाराही महिने चालतात. तुम्ही कोणत्याही ऋतूत कधीही त्यांची चव चाखू शकता. अशाच एका चटणीचे नाव आहे जवसाची चटणी. नेहमीच्या चटण्यांपेक्षा जवसाची चटणी पूर्णपणे वेगळी आणि चवदार असते. विशेष म्हणजे जवसाची चटणी फक्त खायलाच टेस्टी नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांची समस्या असो किंवा महिलांच्या पीरिडय क्रॅम्प्सची समस्या, हे कमी करण्यासाठी जवसाची चटणी मदत करते. चला तर मग जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेली जवसाची चटणी घरी बनवण्यासाठी सोपी रेसिपी.

जवसाची चटणी बनवण्यासाठी साहित्य

- २०० ग्रॅम जवसाच्या बिया

- ८ लाल मिरच्या

- ३ चमचे ऑलिव्ह ऑइल

- ३ चमचे जिरे

- चिंच

- कोथिंबीर

- मीठ चवीनुसार

- पाणी आवश्यकतेनुसार

जवसाची चटणी बनवण्याची पद्धत

जवसाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत एक चमचा तेल टाकून त्यात जवसाच्या बिया टाका आणि सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर एका कढईत थोडे तेल घालून जिरे हलके परतून घ्यावे. आता एका भांड्यात जवस, चिंच आणि जिरे घालून ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. आता या जवसाच्या पावडरमध्ये मीठ आणि मिरची मिक्स करा. नंतर पाण्याच्या साहाय्याने सर्व काही नीट मिक्स करा. 

पुन्हा एकदा या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्याव्यात. या तयार चटणीला तेल आणि कोथिंबिरीच्या पानांनी सजवा.

Whats_app_banner