Indori Poha Recipe: अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला पोहे, उपमा हे पदार्थ बनवले जातात. पोहे म्हटले की सर्वप्रथम 'इंदोरी पोहे'चे नाव घेतले जाते. 'इंदोरी पोहे' त्याच्या चवीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आवडतो. इंदोरी पोह्याची विशेषता म्हणजे ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. एवढंच नाही तर ही रेसिपी तुम्ही फक्त १० मिनिटात तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया परफेक्ट इंदोरी पोहे बनवण्याची रेसिपी
- पोहे - २ कप
- चिरलेला कांदा - १
- चिरलेली मिरची - ४ ते ५
- हिरवा वाटाणा – १/२ कप
- डाळिंबाचे दाणे - १/२ कप
- लिंबू - १
- कढीपत्ता - १२-१५ पाने
- कोथिंबीर - चवीनुसार
- साखर - १ टीस्पून
- मोहरी - १ टीस्पून
- बडीशेप - १ टीस्पून
- धने दाणे - १ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- तेल - २ टेबलस्पून
- मीठ - चवीनुसार
प्रसिद्ध इंदोरी पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्चे पोहे २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीत ठेवावा. आता मध्यम आचेवर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, धने दाणे, कढीपत्ता, बडीशेप आणि हिंग घालून परतून घ्या. मोहरी फुटल्यावर कढईत वाटाणा, हिरवी मिरची आणि कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. दरम्यान चाळणीत ठेवलेल्या पोह्यावर हळद पावडर, मीठ, साखर घालून सर्व काही नीट मिक्स करा. यानंतर कढईत पोहे घालून चांगले मिक्स करा. आता कढई एका प्लेटने २-३ मिनिटे झाकून मध्यम आचेवर शिजू द्या. आता पोहे थोडे मऊ करण्यासाठी त्यावर थोडे पाणी शिंपडून एक वाफ घ्या. नंतर गॅस बंद करा. आता पोहे आणखी एक मिनिट झाकून ठेवा.
तुमचे टेस्टी इंदोरी पोहे तयार आहे. सर्व्हिंग प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर चिरलेला कांदा, शेव, चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, लिंबू घालून गार्निश करा आणि सर्व्ह करा.
संबंधित बातम्या