मराठी बातम्या  /  Lifestyle  /  How To Make Famous Eid Desserts Recipe Of Kimami Sewai

Eid Dessert Recipe: किमामी शेवयाशिवाय अपूर्ण आहे ईदचा सण, नोट करा या डेझर्टची रेसिपी

किमामी शेवया
किमामी शेवया (Freepik)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Apr 21, 2023 09:47 PM IST

Eid ul-Fitr 2023: या ईदला केवळ तुमच्या तोंडातच नाही तर तुमच्या बिघडलेल्या नात्यातही गोडपणा मिसळायचा असेल, तर किमामी शेवयाची ही खास रेसिपी ट्राय करा.

Famous Eid Dessert Recipe of Kimami Sewai: ईद उल फित्र म्हणजे ईद उद्या साजरी होणार आहे. अशा परिस्थितीत ईद स्पेशल बनवण्यासाठी घराघरांत आधीच तयारी सुरू झालेली असते. तुम्हालाही या ईदमध्ये केवळ तोंडातच नाही तर तुमच्या बिघडलेल्या नात्यातही गोडवा मिसळायचा असेल, तर किमामी शेवयाची ही खास रेसिपी ट्राय करा. मावा आणि पाकात बुडवलेले किमामी शेवया केवळ चवीलाच टेस्टी नाही तर बनवायलाही खूप सोपे आहेत. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया ईदची ही खास डेझर्टची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

Eid Recipe: शिरखुर्माने वाढवा ईदचा गोडवा, सोपी आहे बनवण्याची पद्धत

किमामी शेवया बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी

- २०० ग्रॅम बारीक शेवया

- ड्राय फ्रूट्स - काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता आणि बारीक चिरलेला नारळ

- १/४ चमचा वेलची पावडर

- ८-१० धागे केशर

- १०० ग्रॅम मावा

- २०० ग्रॅम साखर

- २०० मिली दूध

- ७-८ चमचे तूप

Eid Special Recipe: ईदच्या दिवशी बनवा खास बंजारा मटण, सगळ्यांना आवडेल ही रेसिपी

किमामी शेवया बनवण्याची पद्धत

ईदच्या दिवशी किमामी शेवया बनवण्यासाठी प्रथम एका कढईत २ चमचे तूप गरम करून त्यात चिरलेला ड्रायफ्रूट्स घालून मंद आचेवर भाजून घ्या. ड्राय फ्रूट्स मधील मनुके भाजण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. ड्रायफ्रुट्स भाजल्यानंतर ताटात काढून वेगळे ठेवा. आता एका कढईत १ चमचा तूप टाकून त्यात मावा घालून थोडा वेळ भाजून घ्या. माव्याचा रंग हलका तपकिरी झाला तर एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता एका पॅनमध्ये साखर आणि पाण्याच्या मदतीने साखरेचा पाक तयार करा. थोड्या वेळाने या पाकात केशर आणि वेलची घाला आणि ७ मिनिटे शिजवा. पाक शिजल्यावर गॅस बंद करा.

Akshay Tritiya Recipe: अक्षय तृतीयेला खीर बनवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक, मिळेल देसी चव

आता एका पॅनमध्ये २-३ चमचे तूप गरम केल्यानंतर त्यात शेवया घाला आणि हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर त्यात दूध घालून थोडा वेळ मंद आचेवर शिजवा. आता ते पुन्हा गरम करून त्यात मावा घालून अजून थोडा वेळ शिजवा. साखरेचा पाक आणि मावा एकजीव झाल्यावर त्यात शेवया घाला आणि चांगले मिक्स करा. शेवया १० मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर शेवयाच्या वरती ड्राय फ्रूट्स टाकून गार्निश करा. तुमची टेस्टी किमामी शेवया तयार आहे.

WhatsApp channel