Falahari Puri Bhaji Recipe: रक्षाबंधनाला प्रत्येक बहिण आपल्या भावासाठी काही गोड पदार्थ किंवा त्याचे आवडते पदार्थ बनवते. शिवाय प्रत्येक घरात सणाच्या दिवशी काही खास पदार्थ बनवले जातात. पण यावर्षी श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन एकाच दिवस आहे. अनेक लोक श्रावण सोमवारचे उपवास करतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या भावाचा सुद्धा श्रावण सोमवारचा उपवास असेल किंवा तुमच्या घरातील सदस्यांचा श्रावणाचा उपवास असेल तर तुम्ही खास उपवासाची पुरी भाजी बनवू शकता. हे बनवायला सोपे आहे. चला तर जाणून घ्या कशी बनवायची उपवासाची पुरी भाजी.
उपवासासाठी साबुदाण्याची पुरी बनवण्यासाठी साहित्य
- एक कप साबुदाणा पावडर
- दोन उकडलेले बटाटे
- १०० ग्रॅम पनीर
- काजूचे बारीक तुकडे
- मनुका
- आल्याची पेस्ट
- हिरवी मिरची बारीक चिरेलेली
- मीठ
सर्वप्रथम साबुदाणा पावडरमध्ये उकडलेले बटाटे मॅश करा. तसेच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा. थोडे मीठ घालून त्यात कोथिंबीर, हिरवी मिरची आणि चवीनुसार आले घालावे. त्याचबरोबर स्टफिंग तयार करण्यासाठी पनीर मॅश करून त्यात बारीक चिरलेले काजू, मनुका, आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची घाला. चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता तयार पीठात स्टफिंग भरून पुरी तळून घ्या.
उपवासाची बटाटा भाजी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
- दोन उकडलेले बटाटे
- हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- टोमॅटो
- मीठ
प्रथम कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. आता त्यासोबत हिरवी मिरची व आल्याची पेस्ट घाला. नंतर चिरलेले टोमॅटो घालून मंद आचेवर शिजवावे. नंतर त्यात उकडलेले बटाटे घालून मंद आचेवर चांगले परतून घ्या. पाणी घालून शिजवावे. तुमची टेस्टी बटाटा भाजी तयार आहे. तुम्हाला भाजीला रस्सा नको असेल तर तुम्ही ही कोरडी देखील बनवू शकता.