Egg Kofta Curry Recipe: जर तुम्ही नेहमी अंडी दोन किंवा तीन प्रकारे शिजवत असाल आणि तुम्हाला काहीतरी नवीन डिश ट्राय करायची असेल तर या वीकेंडला बनवण्यासाठी ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या वीकेंडला अंडा कोफ्ता करी बनवा. हे बनवायला खूप सोपे आणि खायला खूप टेस्टी आहे. नेहमीच्या अंडा करी, अंडा भुर्जी ऐवजी यावेळी अंडा कोफ्ता करीची ही वेगळी डिश बनवा. ही रेसिपी सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे अंडा कोफ्ता करी.
- उकडलेले अंडे - ४
- मसाला पेस्ट (हिरवी मिरची, आले - लसूण आणि कांदा) - १ टेबलस्पून
- लाल तिखट - १/२ टीस्पून
- धने पावडर - १/२ टीस्पून
- गरम मसाला - १/ २ टीस्पून
- जिरे पावडर - १/४ टीस्पून
- चाट मसाला - १/२ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- मीठ - १/२ टीस्पून
- ताजी चिरलेली कोथिंबीर
- कॉर्न फ्लोअर - १ टेबलस्पून
- लोणी - १ टेबलस्पून
- तेल
- लोणी - १ चमचा
- कांदा
- टोमॅटो प्युरी - १ टेबलस्पून
- लाल तिखट - १/२ टीस्पून
- चाट मसाला - १/२ टीस्पून
- मीठ- चवीनुसार
- ताजी चिरलेली कोथिंबीर
अंड्याचे कोफ्ते बनवण्यासाठी प्रथम अंडी किसून घ्या आणि नंतर त्यात सर्व मसाले घाला. नंतर त्यात कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करा. आता त्याचे छोटे गोळे बनवा. आता ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा आणि बाजूला ठेवा. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा घालून परता. मसाला पेस्ट घालून एकत्र परतून घ्या. आता टोमॅटो प्युरी टाका आणि भाजून घ्या. थोडे पाणी घालून शिजवा. लाल तिखट, चाट मसाला, मीठ घालून मिक्स करा. तुमचे अंडा कोफ्ता करी तयार आहेत. कोथिंबीरने गार्निश करून सर्व्ह करा.
संबंधित बातम्या