मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Egg Bread Recipe: सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी बनवा अंड्याचा ब्रेड, जाणून घ्या झटपट होणारी रेसिपी!

Egg Bread Recipe: सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी बनवा अंड्याचा ब्रेड, जाणून घ्या झटपट होणारी रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 29, 2024 11:03 AM IST

Breakfast Recipe: अंड्याच्या ब्रेडमध्ये कॅलरीज कमी असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हा एक उत्तम नाश्ता आहे.

Healthy Breakfast Recipe
Healthy Breakfast Recipe (freepik)

French Toast: सकाळी अनेकदा खूप घाई होते. यावेळी अनेकजण नाश्ता करतच नाही. कारण सकाळी नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ नसतो. पण यावरही उपाय आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही अंड्याचा ब्रेड बनवू शकता. आरोग्याच्या दृष्टिकोनातून अंड्याचा ब्रेड हा हेल्दी ऑप्शन आहे. अंड्यांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबर असतात. जे आहारासाठी फारच उत्तम आहे. सकाळी अँड खाल्ल्याने तुमची हाडे तर मजबूत होतातच पण त्याचबरोबर तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. अंड्याचा ब्रेड खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही, अंड्याच्या ब्रेडमध्ये कॅलरीज कमी असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. घरी अंडी ब्रेड बनवणे अगदी सोपे आहे. हे तुम्ही काही मिनिटांत बनवू शकता, चला तर मग आम्ही तुम्हाला सांगू की ही अंड्याची ब्रेड घरी कसा बनवायचा. 

लागणारे साहित्य

४ अंडी

२ चिरलेले कांदे

२ चमचे बटर

एक हिरवी मिरची

कोथिंबीर

अर्धा टीस्पून ओरेगॅनो

१ स्लाईस चीज

चवीनुसार मीठ

जाणून घ्या कृती

अंड्याचा ब्रेड बनवण्यासाठी प्रथम चार अंडी फोडून एका भांड्यात घ्या आणि छान मिक्स करून घ्या. अंडी फेटल्यानंतर आता त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. त्यानंतर त्यात एक हिरवी मिरची, अर्धा चमचा ओरेगॅनो, मीठ आणि कोथिंबीर घाला. आता त्यांना पुन्हा मिक्स करा. आता या पेस्टमध्ये ब्रेड बुडवून घ्या. बुडवून झाल्यावर ब्रेड तव्यावर ठेवा. आता त्यात २ चमचे बटर मिक्स करा.वरून निघालेली पेस्ट देखील ओता. आता ब्रेड दुसरीकडे पलटा. ब्रेड दोन्ही बाजूंनी नीट शिजवून घ्या. तुमचा अंड्याचा ब्रेड तयार आहे. गरमागरम खा.

WhatsApp channel