मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakfast Recipe: संडे मॉर्निंगची सुरूवात करा एग भुर्जी सँडविचने, मिनिटात होते तयार

Breakfast Recipe: संडे मॉर्निंगची सुरूवात करा एग भुर्जी सँडविचने, मिनिटात होते तयार

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 05, 2023 09:20 AM IST

सुट्टीच्या दिवसाची सुरूवात खास करायची असेल तर नाश्त्यात बनवा एग भुर्जी सँडविच. पहा टेस्टी सोबत हेल्दी असलेली ही रेसिपी.

एग भुर्जी सँडविच
एग भुर्जी सँडविच

Egg Bhurji Sandwich Recipe: जेव्हा हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या नाश्त्याचा विचार येतो तेव्हा अंड्याचे नाव सर्वप्रथम लक्षात येते. आजपर्यंत तुम्ही अंड्याचे ऑम्लेट, उकडलेले अंडे आणि अंड्याची भुर्जी अनेकदा खाल्ली असेल. पण तुम्ही कधी अंडा भुर्जी सँडविच चाखला आहे का? चला जाणून घेऊया काही मिनिटांत टेस्टी एग भुर्जी सँडविच कसा बनवायचा

एग भुर्जी सँडविच बनवण्यासाठी साहित्य

- २ अंडी

- २ स्लाईस ब्राऊन ब्रेड

- १ मध्यम कांदा, चिरलेला

- १ हिरवी मिरची

- कोथिंबीर

- १ लसूण पाकळी

- १/२ टीस्पून काळी मिरी

- १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल

- १/२ टीस्पून तूप

- १/२ टीस्पून मीठ

एग भुर्जी सँडविच बनवण्याची पद्धत

एग भुर्जी सँडविच बनवण्यासाठी प्रथम अंडे फोडून एका भांड्यात काढा. यानंतर कढईत तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मीठ, मिरपूड, बारीक चिरलेला लसूण घालून चांगले परतून घ्या. सर्व गोष्टी नीट भाजून झाल्यावर त्यात हिरवी कोथिंबीर घाला. कांदा सोनेरी तपकिरी झाल्यावर त्यात फेटलेली अंडी घाला आणि परतावे. १-२ मिनिटे फ्राय केल्यावर गॅस बंद करा. तुमची टेस्टी एग भुर्जी तयार आहे. आता एग सँडविच बनवण्यासाठी २ ब्रेड घेऊन आतल्या बाजूला बटर लावून त्यात भुर्जी भरून त्यावर दुसरी ब्रेड ठेवा. आता कढईत तूप टाका आणि सँडविच दोन्ही बाजूंनी हलका तपकिरी होईपर्यंत बेक करा. तुमची टेस्टी एग भुर्जी सँडविच तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग