Tips to Make Eco Friendly Ganpati Idol With Flour and Turmeric: दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी गणेश यांचा जन्म झाला होता. यानिमित्ताने दरवर्षी गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या मूर्तीची मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापना केली जाते. तुम्हीही बाप्पाला आपल्या घरी आणण्याचा विचार करत असाल तर त्यांची मूर्ती घरीच का तयार करू नये, तेही अतिशय इको फ्रेंडली पद्धतीने. यासाठी बाहेरून कोणतीही गोष्ट आणण्याची गरज भासणार नाही आणि स्वत:च्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवून प्रतिष्ठापना करण्याचा खास अुभव वेगळाच असेल. चला तर मग जाणून घेऊया बाप्पाची इको फ्रेंडली मूर्ती बनवण्याचा सोपा मार्ग.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरी इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करू शकता. घरी गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे पीठ, हळद आणि कुंकू. याशिवाय बाप्पाची मूर्ती सजवायची असेल तर बाजारातून मणी, मोती किंवा कुंदन आणू शकता. तसंच साबुदाणा किंवा तांदळाच्या साहाय्याने ही मूर्ती नैसर्गिक पद्धतीने सजवू शकता.
घरात गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी सर्वप्रथम पिठात थोडी हळद मिसळून पाण्याने मळून घ्या. आता गणेशाच्या शरीराचे वेगवेगळे भाग बनवण्यासाठी अनेक गोळे तयार करा. मूर्तीचा बेस एका गोळ्यापासून बनवा आणि मग गणेशाचे हात, पाय, सोंड, डोकं, कान इ. वेगवेगळ्या गोळ्यांपासून बनवा. गणपतीचे हात, पाय चमच्याच्या साहाय्याने बनवता येतात. तर लहान ग्लास आणि वाटीच्या साहाय्याने शरीराचा उर्वरित भाग तयार करता येतो.
आता शरीराचे सर्व अवयव मूर्तीच्या बेसशी जोडा. माचिसची काडी किंवा सुई सारख्या धारदार वस्तूने गपणतीचे डोळे, नाक आणि ओठांना आकार द्या. यानंतर सोंड लावा. आता ब्रशमध्ये थोडे पाणी लावून मूर्तीच्या जोड असलेल्या भागावर फिरवावे. यामुळे मूर्तीचे सर्व सांधे व्यवस्थित फिक्त होतील.
याशिवाय थोडाशा पिठात कुंकू मिसळून मळून घ्या. याद्वारे गणपती बाप्पाचे धोतर, चुनरी आणि श्रृंगार करा. साबुदाणा, तांदूळ आणि रंगीबेरंगी डाळीच्या साहाय्याने सुद्धा बाप्पाची मूर्ती सजवू शकता. अशा प्रकारे तुमची इको फ्रेंडली आणि सुंदर बाप्पाची मूर्ती तयार होईल.