Masala Corn Chaat Recipe: लहान मुले असो वा मोठे कॉर्न सर्वांनाच आवडते. हे फक्त खायला टेस्टी लागत नाही तर ते आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. वजन कंट्रोल करणारे लोक आणि मधुमेही रुग्णांनी ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर त्यांना अनेक फायदे मिळू शकतात. पण जर कॉर्न जास्त प्रमाणात खाल्ले तर वजन वाढू शकते. कॉर्न पासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचे असेल तर तुम्ही मसाला कॉर्न चाट बनवू शकता. अनेकदा रस्त्यावर किंवा मॉलमध्ये तुम्ही हे खाल्ले असेल. पण हे घरी हेल्दी पद्धतीने बनवू शकता. यात तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्या सुद्धा टाकू शकता. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे टेस्टी मसाला कॉर्न चाट
- स्वीट कॉर्न
- बारीक चिरलेला कांदा
- काकडी
- टोमॅटो
- कोथिंबीर
- चिरलेली हिरवी मिरची
- लिंबू
- शेंगदाणे
- चिली फ्लेक्स
- ओरेगॅनो
- काळी मिरी
- चाट मसाला
- बटर
- मीठ
तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही पाण्यात कॉर्न आणि मीठ घालून ५ ते १० मिनिटे उकळवा. तुमच्याकडे वेळ असेल तर हे वाफेवर शिजवणे हा उत्तम असेल. कारण वाफवल्याने तुम्हाला कॉर्न मधील सर्व पोषण मिळते. कॉर्न शिजल्यावर त्यात बटर घालावे. मीठ, चाट मसाला, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, काळी मिरी, काळे मीठ, चिरलेली कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, काकडी, तळलेले शेंगदाणे घाला. हे सर्व चांगले मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चिरलेली फळे, डाळिंबाचे दाणे आणि फ्राइड काजूही घालू शकता. जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस नसाल तर तुम्ही भुजिया देखील घालू शकता. हे सर्व नीट मिक्स करा. हे आता सर्व्ह करण्यासाठी एका बाऊलमध्ये काढा. थोडेसे लिंबाचे रस सुद्धा घालू शकता. कोथिंबीर, भुजियाने गार्निश करुन सर्व्ह करा.