
Custard Cake Recipe for Christmas: जगभरात आज म्हणजे २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण साजरा केला जात आहे. एकमेकांना शुभेच्छा, गिफ्ट देण्यासोबतच लोक घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करतात. ख्रिसमस पार्टी म्हटली की विविध व्यजनांसोबतच केक आवर्जुन तयार केला जातो. केक शिवाय ख्रिसमस पार्टीचा विचार केला जात नाही. ख्रिसमस पार्टीसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे, फ्लेवरचे केक बनवतात. तुमच्या घरी सुद्धा ख्रिससमची पार्टी असेल आणि तुम्ही झटपट तयार होणाऱ्या केकची रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. विशेष म्हणजे हा केक बनवण्यासाठी तुम्हाला अंडी आणि ओव्हनची गरज पडणार नाही. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या कसा बनवायचा टेस्टी कस्टर्ड केक.
- १ कप मैदा
- १/४ कप कस्टर्ड पावडर
- १/२ कप साखर
- १/२ कप दूध
- दीड टीस्पून बेकिंग पावडर
- १/२ कप ऑलिव्ह ऑईल
झटपट कस्टर्ड केक बनवण्यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये मैदा, व्हॅनिला कस्टर्ड पावडर आणि बेकिंग सोडा घ्या. हे सर्व चाळणीतून चाळून घ्या आणि नीट मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास या तीन गोष्टी नीट मिक्स करून नंतरही गाळू शकता. आता मिक्सरमध्ये साखर बारीक करुन घ्या. साखरमध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा बटर घालून चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण कस्टर्ड पावडरच्या मिश्रणात घालून चांगले मिक्स करा. यानंतर बॅटरमध्ये दूध मिसळत रहा. जेणेकरून पिठ जास्त घट्ट होणार नाही. हे बॅटर चांगले स्मूद होईपर्यंत मिक्स करत राहा. आता केकच्या साच्याला तूप किंवा बटर लावून ग्रीस करा. नंतर त्यात तयार केलेले बटर टाका. आता केक बनवण्यासाठी कुकरमध्ये मीठ टाका आणि ७-८ मिनिटे मंद आचेवर गरम करा. आता मिठावर जाळीचा स्टँड ठेवा आणि कुकरमध्ये बॅटर असलेले केकचा साचा ठेवा. आता कुकरची शिट्टी काढून झाकण बंद करा आणि केक मध्यम आचेवर ४०-५० मिनिटे बेक करा.
साधारण ४० मिनिटांनंतर चाकूच्या मदतीने केक एकदा चेक करा. केक तयार झाल्यावर साधारण २ तास थंड होण्यासाठी राहू द्या. तुमचा कस्टर्ड केक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
संबंधित बातम्या
