Kheer Recipe: सर्वपित्री अमावस्येला बनवा दुधी भोपळ्याची खीर, नोट करा रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kheer Recipe: सर्वपित्री अमावस्येला बनवा दुधी भोपळ्याची खीर, नोट करा रेसिपी

Kheer Recipe: सर्वपित्री अमावस्येला बनवा दुधी भोपळ्याची खीर, नोट करा रेसिपी

Published Oct 13, 2023 01:56 PM IST

Sarvapitri Amavasya 2023: सर्वपित्री अमावस्येला खीरला महत्त्व असते. नेहमीची तांदळाची खीर न बनवता तुम्ही यावेळी दुधी भोपळ्याची खीर बनवू शकता.

दुधी भोपळ्याची खीर
दुधी भोपळ्याची खीर (Freepik)

Dudhi Bhopla or Lauki Kheer Recipe: सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांना मोक्ष देण्यासाठी पूजा केली जाते. यावेळी सात्विक भोजन बनवले जाते. यात खीरला विशेष महत्त्व असते. खीर सर्व पदार्थांमध्ये सर्वोत्तम मानली जाते. असे मानले जाते की गोड खाल्ल्यानंतर ब्राम्हण, पितर आणि देव तृप्त होतात. सामान्यतः या दिवशी तांदळाची खीर बनवली जाते. पण तुम्ही तांदळाची खीर अनेकदा तयार करून खाल्ली असेल. अशा परिस्थितीत दुधी भोपळ्याची खीर कशी बनवली जाते जाणून घ्या. ही खीर बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे.

दुधी भोपळ्याची खीर बनवण्यासाठी साहित्य

- १ कप किसलेले दुधी भोपळा

- २ कप दूध

- १/२ टीस्पून वेलची पावडर

- १ टेबलस्पून चिरलेले ड्रायफ्रुट्स

- १ टीस्पून देशी तूप

- १/२ कप साखर

दुधी भोपळ्याची खीर बनवण्याची पद्धत

दुधी भोपळ्याची खीर बनवण्यासाठी प्रथम दुधी भोपळ्याचे साल काढून घ्या. नंतर ती धुवून आणि किसून घ्या आणि एका भांड्यात बाजूला ठेवा. आता एका खोल तळाच्या भांड्यात दूध घालून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. दूधात एक दोनदा उकळी आल्यावर गॅस बंद करा. आता एका कढईत १ चमचा देशी तूप घालून गरम करा. या तुपात किसलेली दुधी भोपळा टाका आणि दुधी भोपळा नीट शिजून मऊ होईपर्यंत शिजवा. दुधी भोपळा नीट शिजून मऊ झाल्यावर त्यात गरम केलेले दूध घालून मंद आचेवर चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. मोठ्या चमच्याने अधूनमधून खीर ढवळत राहा. दूध व्यवस्थित घट्ट होईपर्यंत खीर शिजवावी लागेल. यानंतर दुधात चवीनुसार साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा. 

नंतर खीरमध्ये चिरलेला ड्रायफ्रूट्स घाला आणि आणखी ३-४ मिनिटे शिजू द्या. गॅस बंद करा आणि एका मोठ्या सर्व्हिंग बाऊलमध्ये खीर काढा. त्यावर ड्रायफ्रुट्सने सजवा. तुमची चविष्ट दुधी भोपळ्याची खीर तयार आहे.

Whats_app_banner