Dry Fruits Modak Recipe: गणेशोत्सवच्या सणाची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. गणेश चतुर्थीच्या सणात गणेशाचे कैलास पर्वतावरून पृथ्वीवर आगमन झाल्याचा उत्सव त्याच्या आई पार्वतीसह साजरा केला जातो. हा सण बुद्धीचा आणि समृद्धीचा हिंदू देवता गणेशाचा जन्माचे प्रतिक आहे. यावर्षी १९ सप्टेंबरपासून १० दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अशा वेळी दहा दिवस बाप्पाला वेगवेगळ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो. बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू सहज उपलब्ध होत असल्या, तरी घरी तयार होणाऱ्या प्रसादाची चव वेगळी असते. बाप्पाचे आवडते मोदक घरी बनवायचे असतील तर तुम्ही सुक्या मेव्याचे मोदक ट्राय करू शकता. ते कसे बनवायचे ते येथे जाणून घ्या.
५ ते ६ खजूर
अर्धी वाटी भाजलेले बदाम
अर्धी वाटी काजू
अर्धी वाटी ड्राय फ्रुट्स
मॅपल सिरप
मोदक मोल्ड
-ड्रायफ्रुट्सचे मोदक बनवण्यासाठी ड्रायफ्रुट्स कापून ते हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर खजुरांच्या बिया काढून टाका. ग्राइंडर मध्ये सर्व साहित्य एकत्र घाला आणि पीठ होईपर्यंत बारीक करा. बारीक करताना मोदक बांधले जाणार नाहीत असे वाटत असेल तर आणखी काही खजूर घालून पीठ मळून घ्या. ते तयार झाल्यावर मॅपल सिरपने साच्याला ग्रीस करा आणि या मिश्रणाचा मोठा भाग घ्या आणि आत घाला. परिपूर्ण आकारासाठी सर्व बाजूंनी पुरेसे साहित्य घाला. सर्व मोदक अशाच प्रकारे बनवा आणि बनवल्यानंतर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. सुमारे १ तास सेट करण्यासाठी राहू द्या. फ्रीजमधून मोदक काढून ताटात ठेवा आणि बाप्पाला अर्पण करा.
संबंधित बातम्या