Dry Fruits Dates Modak Recipe: मोदक हा बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. असे मानले जाते की युद्धादरम्यान परशुरामाच्या हल्ल्यात गणेश यांचा एक दात तुटला होता. ज्यानंतर त्यांना खाण्यास त्रास झाला, तेव्हा माता पार्वतीने त्यांना मऊ मोदक दिले. हे बाप्पाला खूप आवडले आणि तेव्हापासून मोदक हा त्यांचा आवडता प्रसाद आहे. मोदकांचे अनेक प्रकार आहेत. गणेश उत्सवात काही लोक बाप्पाला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करतात. येथे आम्ही तुम्हाला ड्रायफ्रुट्स खजुराचे मोदक कसे बनवायचे ते सांगत आहोत. हे मोदक शुगर फ्री असून प्रत्येकाला सहज बनवता येतात. हे मोदक बनवण्यासाठी कोणत्याही साखरेचा वापर केलेला नसल्याने ते आरोग्यदायी देखील आहेत. चला तर मग जाणून घ्या झटपट तयार होणाऱ्या ड्रायफ्रूट्स खजूर मोदकची रेसिपी.
- अर्धा कप बदाम
- अर्धा कप काजू
- मूठभर पिस्ता
- काही खजूर
- दोन चमचे तूप
मोदक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करावे. नंतर बदाम, काजू आणि पिस्ता घाला. त्यांना काही मिनिटे परतून घ्या. नंतर पॅनमधून काढून बाजूला ठेवा. हे थोडा वेळ थंड होऊ द्या. ड्राय फ्रूट्स थंड झाल्यावर खजूरही चिरून घ्या. मऊ खजूर वापरण्याचा प्रयत्न करा. जर ते कडक असतील तर तुम्ही त्यांना गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवा. नंतर मिक्सरमध्ये भाजलेले ड्राय फ्रूट्स घालून बारीक करून घ्यावेत. आता त्यात खजूर घालून आणखी काही वेळा बारीक करून घ्या. हे सर्व नीट मिक्स होईपर्यंत चांगले ब्लेंड करा.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मिश्रणात थोडं तूप घालू शकता. आता ते तयार झाल्यावर साच्याच्या साहाय्याने मोदक बनवा. साचा नसेल तर हातानेही मोदक बनवू शकता. तुमचे ड्रायफ्रूट्स खजूर मोदक तयार आहेत.