Lips Care: हिवाळ्यात फाटलेल्या ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी करा या गोष्टी, ओठ होतील सॉफ्ट-how to make dry chapped lips soft in winter try these things ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lips Care: हिवाळ्यात फाटलेल्या ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी करा या गोष्टी, ओठ होतील सॉफ्ट

Lips Care: हिवाळ्यात फाटलेल्या ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी करा या गोष्टी, ओठ होतील सॉफ्ट

Jan 19, 2024 10:22 AM IST

Winter Care Tips: हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात आणि फाटू लागतात. फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही या काही गोष्टी करू शकता.

फाटलेले ओठ सॉफ्ट करण्यासाठी उपाय
फाटलेले ओठ सॉफ्ट करण्यासाठी उपाय (unsplash)

Tips to Keep Dry Lips Moist: हिवाळ्याच्या दिवसात हवा खूप थंड असते. कोरड्या हवेमुळे त्वचा सुद्धा कोरडी होऊ लागते. तसेच ओठ सुद्धा कोरडे होतात. या काळात बहुतेकांना ओठ फाटण्याची समस्या असते. ही एक सामान्य समस्या असली तरी काही लोकांना याचा खूप त्रास होतो. खरं तर थंडीच्या दिवसात ओलावा नसतो. अशा स्थितीत काही लोकांना फाटलेल्या ओठांमधून रक्त सुद्धा येते. यामुळे त्रास तर होतोच पण यामुळे सौंदर्यही बिघडते. जर तुम्हालाही या तुम्ही सुद्धा फाटलेल्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही काही घरगुती उपाय फॉलो करू शकता. याचा अवलंब करून तुम्ही ओठ सॉफ्ट करू शकता.

फाटलेल्या ओठांची समस्या कशी टाळावी

ओठ फाटण्याची समस्या टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. हिवाळ्यात हे करणे कठीण होऊ शकते. पण तुम्ही स्वतःला हायड्रेट करूनच ही समस्या टाळू शकता. जर तुम्ही जास्त पाणी पीत नसाल तर तुमच्या रुटीनमध्ये ज्यूस, नारळ पाणी यासारख्या लिक्विड पदार्थांचा समावेश करा.

या ३ पद्धतींचा करा अवलंब

- फाटलेल्या ओठांचा सामना करण्यासाठी तुम्ही तीन पद्धतींचा अवलंब करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे ओठांवर दुधाची साय लावणे सुरू करा. दुधाची साय त्वचेसाठी खूप चांगले आहे. दुधाची साय लावल्याने ओठ खूप चमकदार आणि मऊ होतील. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ते लावू शकता.

- कोरड्या ओठांना पुनरुज्जीवित करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल लावा. बदामाचे तेल अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी भरलेले असते. ओठ मऊ करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

- फाटलेल्या ओठांवर रोज तुप लावायला सुरुवात करा. कोरडे किंवा फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी तूप उत्तम आहे. हे ओठ पूर्णपणे मऊ करू शकते. हे लावणे खूप सोपे आहे. फक्त आपल्या बोटावर तूप घ्या आणि लिप बामसारखे लावा. तुम्ही हे रात्री झोपताना सुद्धा लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner