Dahi Bhindi Recipe: दुपारच्या जेवणासाठी बनवा तडका दही भेंडी, सर्वांना आवडेल ढाबा स्टाईल रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dahi Bhindi Recipe: दुपारच्या जेवणासाठी बनवा तडका दही भेंडी, सर्वांना आवडेल ढाबा स्टाईल रेसिपी

Dahi Bhindi Recipe: दुपारच्या जेवणासाठी बनवा तडका दही भेंडी, सर्वांना आवडेल ढाबा स्टाईल रेसिपी

Jun 18, 2024 11:15 AM IST

Lunch Recipe: दुपारच्या जेवणात भेंडीची भाजी बनवण्याचा विचार करत असाल तर यावेळी वेगळी रेसिपी ट्राय करा. तडका दही भेंडीची रेसिपी टेस्टी आणि सोपी आहे.

तडका दही भेंडी रेसिपी
तडका दही भेंडी रेसिपी

Tadka Dahi Bhindi Recipe: अनेकदा त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी वेगळं आणि चविष्ट खावंसं वाटतं. जर तुम्हीही काहीतरी वेगळं खाण्याचा विचार करत असाल तर भेंडीची ही टेस्टी भाजी बनवू शकता. तडका दही भेंडी असे या भाजीचे नाव आहे. ही भाजी बनवायला सोपी असून घरी ठेवलेल्या वस्तूंपासून पटकन तयार होते. ही भाजी पोळी आणि पराठ्याबरोबर जबरदस्त लागते. जर तुम्हाला घरी तडका दही भेंडी बनवायची असेल तर येथे त्याची रेसिपी जाणून घ्या. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही ढाबा स्टाईल रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची तडका दही भेंडी.

तडका दही भेंडी बनवण्यासाठी साहित्य

- भेंडी २५० ग्रॅम

- दही १ कप

- तेल १/४ कप

- कांदा १

- हिरवी मिरची २

- लसूण ५ पाकळ्या

- कोथिंबीर

- जिरे १ चमचा

- लाल तिखट ३/४ टीस्पून

- हळद १/२ टीस्पून

- धणे पावडर १ टीस्पून

- गरम मसाला

- मीठ चवीनुसार

तडका दही भेंडी बनवण्याची पद्धत

ही भाजी बनण्यासाठी सर्वप्रथम भेंडी नीट धुवून पुसून घ्या. आता एका भेंडीचे चार तुकडे करावेत. त्यात थोडे मीठ आणि हळद घालून मिक्स करा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात मीठ हळद लावलेली भेंडी भाजून घ्या. चांगले भाजून झाल्यावर त्यात आणखी थोडे तेल घाला. नंतर त्यात जिरे घालून तडतडून घ्या. आता त्यात कांदा, लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. नंतर दह्यात सर्व मसाले, तळलेली लाल तिखट घालून चांगले मिक्स करावे. हे चांगले मिक्स करून कांद्यामध्ये घाला. चांगले भाजून त्यात भाजलेली भेंडी घाला. आता मीठ घालून सर्व काही नीट मिक्स करा. गरम मसाला आणि कोथिंबीर घाला. तुमची ढाबा स्टाईल तडका दही भेंडी तयार आहे. पोळी किंवा पराठ्याबरोबर गरमा गरम सर्व्ह करा.

Whats_app_banner