मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Halwa Recipe: गव्हाच्या पिठापासून बनवा स्वादिष्ट हलवा, जाणून घ्या सोपी रेसिपी!

Halwa Recipe: गव्हाच्या पिठापासून बनवा स्वादिष्ट हलवा, जाणून घ्या सोपी रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 26, 2024 03:39 PM IST

Sweets Recipe: जेवणानंतर काही तरी गोड खावंसं वाटत आहे? तर गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या या स्वादिष्ट हलव्याचा आस्वाद घेऊ शकता.

how to make Delicious halwa from wheat flour
how to make Delicious halwa from wheat flour (freepik)

Gavhachya Pithacha Halwa Recipe: जेवणानंतर काही तरी गोड खावंसं वाटतं. पण अनेकदा गोड म्हंटल की अनहेल्दी पदार्थ डोळ्यासमोर येतात. रात्रीच्या जेवणानंतर तर हमखास मिठाईची लालसा होते. तुम्हालाही असेच होत असे आणि काहीतरी स्वादिष्ट खावेसे वाटत असेल, तर स्वादिष्ट गव्हाच्या पिठाचा हलवा बनवा. हा हलवा टेस्टी आणि हेल्दीही आहे. गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा हलवा लहान ते मोठे सगळ्यांचं फार आवडेल. पण, अनेकांना गव्हाच्या पिठाचा हलवा बनवणे कठीण वाटू शकते. कारण पीठ व्यवस्थित शिजले नाही तर ते कच्चे लागते.परंतु जर तुम्हाला पिठाचा हलवा घरीच बनवायची असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या या टिप्स फॉलो करून उत्तम गव्हाच्या पिठाचा हलवा बनवू शकता.

लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ २ वाट्या

गूळ १ वाटी

तूप

रवा

जाणून घ्या कृती

गव्हाचा हलवा बनवण्यासाठी प्रथम गॅस चालू करा आणि त्यावर तवा ठेवा.

तवा गरम झाल्यावर त्यावर गव्हाचे पीठ घाला.

पीठ चांगले भाजून घ्या.

पीठ लाल झाल्यावरत तव्यातून बाहेर काढा. आता त्यात तव्यावर ड्रायफ्रूट्स भाजून घ्या.

आता एक कढई घ्या त्यात तूप घालून भाजलेले पीठ परत एकदा परतून घ्या.

पिठाचा हलवा चवदार होण्यासाठी त्यात १ चमचा कोरडा भाजलेला रवा घाला. त्यामुळे हलव्याची चव वाढेल.

हलवा जळू नये यासाठी सतत ढवळत राहा.

या पिठात वरून १ चमचा तूप घालून भाजून घ्या. हे पीठ कोरडे होण्यापासून कमी करेल.

आता पिठात गूळ आणि पाणी घालून मंद आचेवर शिजवा.

यामध्ये ड्रायफ्रुट्स टाका आणि आता गरमागरम सर्व्ह करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel

विभाग