Healthy Breakfast Recipe: बाजरी हे सुपरफूड आहे. हिवाळ्यात तर आवर्जून याचा आहारात समावेश करावा.बाजरीत अनेक प्रकारचे पोषण समाविष्ट आहे जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. वेगवगेळ्या रेसीपीमध्ये बाजरी वापरू शकता. जर तुम्ही नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ शोधत असाल तर बाजरी उपमा सर्वोत्तम आहे. तुम्ही रव्याचा उपमा अनेकदा बनवला असेल. पण यावेळी बाजरीचा उपमा करून पहा. बाजरीत फायबर, कॅल्शियम, लोह, जस्त, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६, कॅरोटीन, लेसीथिन यांसारखे अनेक पोषक घटक असतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन बी३ देखील असते, जे शरीरातील मेटाबॉलिज्म प्रक्रिया व्यवस्थित ठेवते. बाजरीच्या सेवनाने पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा धोका टळतो. चला बाजरी उपमा तयार करण्याची पद्धत जाणून घ्या.
१ कप ज्वारी बाजरी, १/२ कप चिरलेली गाजर, १/२ कप चिरलेला कांदा, १ टीस्पून लसूण-आले पेस्ट, १/२ कप चिरलेला टोमॅटो, १/२ कप चिरलेली सिमला मिरची, २ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ, १ कप पाणी, कोथिंबीर सजवण्यासाठी
> आदल्या रात्री बाजरी चांगली धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी तयार उकडून घ्या.
> मायक्रोवेव्हच्या भांड्यात तेल, मोहरी, जिरे, कांदा, गाजर, सिमला मिरची, आले-लसूण पेस्ट आणि मीठ घालून मिक्स करा. हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर तीन मिनिटे शिजवा.
> वेळ झाल्यावर बाहेर काढा आणि त्यात उकडलेली ज्वारी आणि टोमॅटो घाला. चांगले मिसळा आणि आणखी चार मिनिटे शिजवा.
> यानंतर वाटी काढा. पाणी घालून चांगले मिसळा आणि पुन्हा सात मिनिटे शिजवा.
> बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा. हा बाजरीचा उपमा गरमागरम चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
> या उपमा डिशच्या वर लिंबू पिळायला विसरू नका. जमल्यास यामध्ये तुम्ही बारीक चिरलेल्या सिजनल भाज्या देखील घाला.