मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dal Dhokali Recipe: नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा डाळ ढोकळी!

Dal Dhokali Recipe: नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा डाळ ढोकळी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
May 17, 2023 12:08 PM IST

Lunch Recipe: उन्हाळ्यात खाण्यासाठी डाळ ढोकळी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. घरात भाजी नसेल तर डाळ ढोकळी हा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बेस्ट पर्याय ठरेल.

Healthy Summer Recipe
Healthy Summer Recipe (Freepik)

Dinner Recipe: उन्हाळा हा आहाराच्या दृष्टीने फारसा अनुकूल नाही. उन्हाळ्यात फार विचारपूर्वक पदार्थ खावे लागतात. उन्हामुळे आणि त्यात चुकीचं खाल्ल्याने आजरी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो हलकं आणि हेल्दी अशा पदार्थांच्या शोधात सगळे असतात. तुम्हीही असेच काहीतरी शोधत असाल तर डाळ ढोकळी हा एक चांगला पर्याय असू शकतो. डाळींपासून बनवलेली ही रेसिपी खायला चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही चांगली आहे. चणा डाळीपासून बनवलेली डाळ ढोकळी एकदा कोणी खाल्ली की पुन्हा पुन्हा नक्की मागेल. ही गुजराती डाळ बनवायलाही खूप सोपी आहे. बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

लागणारे साहित्य

चण्याची डाळ - १ कप

शेंगदाणे - २ टेस्पून

आले - १ टीस्पून

मोहरी - १ टीस्पून

जिरे - १/२ टीस्पून

हळद - १/२ टीस्पून

लाल मिरची - १/२ टीस्पून

जिरे पावडर - १/२ टीस्पून

धणे पावडर - १/२ टीस्पून

गरम मसाला - १/२ टीस्पून

हिंग - १ चिमूटभर

अख्खी लाल मिरची - १

कढीपत्ता - ५

बारीक चिरलेला कांदा - १

बारीक चिरलेला टोमॅटो - १

लिंबाचा रस - १ टीस्पून

बारीक चिरलेली कोथिंबीर - चवीनुसार

आले-लसूण पेस्ट - १ टीस्पून

मीठ - चवीनुसार

गूळ

ढोकळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ - १ कप

हळद - १/२ टीस्पून

लाल तिखट - १/२ टीस्पून

ओवा- १/२ टीस्पून

मीठ - चवीनुसार

तेल - नुसार

जाणून घ्या कृती

डाळ ढोकळीसाठी सर्वप्रथम डाळ तयार केली जाते. डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळ २-३ वेळा चांगली धुवून घ्यावी. यानंतर प्रेशर कुकर घ्या, त्यात १ कप डाळ आणि २ कप पाणी सोबत शेंगदाणे आणि १ चमचे तेल घाला आणि ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. आता एका कढईत एक चमचा तूप, चिमूटभर हिंग, १ चमचा मोहरी, जिरे, लाल मिरच्या आणि कढीपत्ता तळून घ्या. यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. त्याचा रंग सोनेरी तपकिरी झाल्यावर त्यात टोमॅटो आणि आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यात शिजवलेली डाळ घाला. त्यावर आणखी १ कप पाणी घाला आणि चांगले मिसळा. मसूर मिक्स झाल्यावर त्यात हळद, तिखट, धने पावडर, जिरेपूड आणि गरम मसाला घाला. शेवटी ढवळत असताना त्यात गूळ, मीठ आणि १ चमचा लिंबू घालून डाळ पुन्हा उकळवा.

ढोकळी बनवण्याची पद्धत

ढोकळी बनवण्यासाठी एका भांड्यात १ वाटी गव्हाचे पीठ, हळद, तिखट, ओवा, मीठ आणि २ चमचे तेल टाका. हे सर्व एकत्र केल्यानंतर हे पीठ चांगले मळून घ्या. लक्षात ठेवा की पीठ जास्त घट्ट नसावे. यानंतर, या पिठाचा एक गोळा घ्या आणि कोणत्याही आकारात त्याचे लहान गोळे करा. आता ढोकळ्याचे तुकडे उकळत्या डाळीत टाकून नीट ढवळून घ्यावे. ढोकळी घातल्यानंतर झाकण ठेवून सुमारे १५ मिनिटे डाळ शिजवा. शेवटी, आपण हिरव्या कोथिंबीरने सजवू. आता ती चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करता येते.

WhatsApp channel