Dal Bukhara Recipe: रोजच्या जेवणात वरण बनवले जाते. काही लोक फक्त तुरीचे वरण नाही तर वेगवेगळ्या डाळींचे वरण बनवतात. पण तीच डाळ बनवून कंटाळा येत असेल तर काहीतरी वेगळं करून बघा. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी उडीद डाळीपासून बनवलेल्या दाल बुखाराची रेसिपी शेअर केली आहे. जे सहज बनवता येते आणि रोजच्या जेवणाची चव वाढवता येते. पोळी असो वा भात ही डाळ दोन्हीसोबत चांगली लागते. चला तर मग जाणून घेऊया दाल बुखारा बनवण्याची रेसिपी
- एक कप उडीद डाळ
- ४-५ लवंगा
- दोन इंच आल्याचा तुकडा
- मीठ
- तमालपत्र
- एक कप टोमॅटो प्युरी
- दोन चमचे काश्मिरी लाल मिरची
- दोन चमचे बटर
- एक चतुर्थांश कप सिंगल क्रीम
- एक चमचा गरम मसाला
- पाणी
प्रथम डाळ नीट धुवून घ्या आणि साधारण सात ते आठ तास भिजवा. आता डाळ प्रेशर कुकरमध्ये टाकून त्यात साडेतीन कप पाणी घालावे. यासोबत तमालपत्र आणि मीठ टाका. आता कुकरचे झाकन लावून ७ ते ८ शिट्ट्या घ्या. गॅस बंद करून कुकरचा प्रेशर स्वतः निघू द्या. जेणेकरून डाळ चांगली शिजेल. आता त्यात आल्याची पेस्ट, लसूण, टोमॅटो प्युरी, काश्मिरी लाल मिरच्या, मीठ, बटर घाला. त्यासोबत एक कप कोमट पाणी घाला. चांगले मिक्स करा. डाळ मंद आचेवर झाकण उघडे ठेवून डाळीला उकळी येईपर्यंत शिजवावी. मंद आचेवर सुमारे ४० मिनिटे शिजवा. डाळ तळाला लागू नये म्हणून मध्ये मध्ये हळूहळू ढवळा. डाळ घट्ट झाली असेल आणि तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तुम्ही त्यात एक कप गरम पाणी घालू शकता.
आता क्रीम घालून मिक्स करा. थोडा वेळ शिजवून त्यात गरम मसाला घालून मंद आचेवर आणखी दोन मिनिटे शिजू द्या. गॅस बंद करून कोथिंबीरने गार्निश करून सर्व्ह करा.
संबंधित बातम्या