Dahi Paneer Paratha Recipe: जर तुम्हाला रोज रात्रीच्या जेवणात तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही काहीतरी नवीन करून पाहू शकता. ज्याला बनवायला जास्त मेहनत किंवा जास्त वेळ लागणार नाही. रात्रीच्या जेवणासाठी वन मील ऑप्शन शोधत असाल तर पराठे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. फक्त एक प्रकारचा पराठा पटकन बनवा, जे घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक सदस्याला खायला आवडेल. दही आणि पनीरच्या मदतीने चविष्ट त्रिकोणी पराठे बनवा. हे पराठे बनवायला सोपे आणि लवकर तयार होतात. चला तर मग जाणून घ्या दही पनीर पराठ्याची रेसिपी.
- गव्हाचे पीठ
- १०० ग्रॅम पनीर
- एक कप निथळलेले दही
- बारीक चिरलेली कोबी
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली सिमला मिरची
- एक चमचा लाल मिरची ठेचून
- एक टीस्पून काळी मिरी
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- एक ते दोन चमचे तेल
- ओवा
- जिरे पावडर
- चवीनुसार मीठ
हे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन घेऊन त्यात मीठ, तेल आणि ओवा घालून मिक्स करा आणि मऊ पीठ मळून घ्या. हे पीठ थोडा वेळ झाकून ठेवा. आता एका भांड्यात दही घ्या. आधी दही कापडात बांधून लटकवावे, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निघून जाईल. आता हे दही वापरा. दह्यासोबत त्या भांड्यात पनीर मॅश करा. तसेच बारीक चिरलेली कोबी, सिमला मिरची आणि कांदा घाला. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा. या मिश्रणात मसाले घाला. मसाल्यात ठेचलेली लाल मिरची, काळी मिरी पावडर, जिरे पूड आणि मीठ घाला. तुम्हाला लाल मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास चवीनुसार मसाल्यांचे प्रमाण वाढवू शकता. आता या सर्व गोष्टी मिक्स करा. आता मळलेल्या पीठाचा गोळा घ्या आणि लाटून घ्या. लाटल्यानंतर तयार केलेले मिश्रण या पोळीवर ठेवा आणि हाताच्या मदतीने त्रिकोणी आकार द्या. आता कडांना पाणी लावून तीन बाजूंनी दुमडून मिश्रणाच्या वरती चिकटवा. लक्षात ठेवा की सारण भरल्यावर लाटू नका नाहीतर सारण बाहेर येईल.
आता गरम तव्यावर हलक्या हाताने ठेवा आणि एका बाजूने सोनेरी होईपर्यंत शिजवा. जेणेकरुन ते शिजल्यानंतर टाइट होईल आणि फाटणार नाही. त्याच पद्धतीने दुसरी बाजू भाजून घ्या. तुमचे टेस्टी दही पनीर पराठे तयार आहेत. हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.