Easy Dinner/Lunch Recipe: रेगुलर भाजी खाऊन कंटाळा येतो. उन्हाळा सुरु आहे. उन्हाळयात भाज्या बाजारात उपलब्ध होत नाहीत. मग अशावेळी काय करावं समजत नाही. जी उपल्बध असेल ते भाजी बनवली जाते. पण कोणतीही भाजी खायला आवडत नसेल तर तेव्हा तुम्ही पटकन दही आणि बटाट्यापासून एक अप्रतिम भाजी तयार करून खाऊ शकता. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दही बटाटे किंवा दही आलूची भाजी मोठ्या आनंदाने खाल्ले जातात. ही भाजी आहे जी तुम्हीचपाती, किंवा भातासोबत खाऊ शकता. विशेष म्हणजे दही बटाटे बनवणे अगदी सोपे आहे. घरात भाजी नसते तेव्हा ही कमी साहित्यात तुम्ही ही भाजी खाऊ शकता. ही भाजी चवीला एकदम वेगळी लागते. चला जाणून घेऊया सुपर टेस्टी दही बटाटे कसे बनवायचे?
> दही आलू/ दही बटाटे बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकडून घ्या. २ लोकांसाठी बनवायचं असल्यास २ मध्यम बटाटे पुरेसे आहेत.
> आता दही फेटून घ्या, थोडे पातळ करा आणि मसाले तयार करा.
> दही बटाटे बनवण्यासाठी १ मध्यम कांदा, हिरवी मिरची आणि लसूणच्या ७-८ पाकळ्या चिरून घ्या.
> बटाटे उकडल्यानंतर ते सोलून त्याचे जाड तुकडे करा.
> एक कढई घ्या आणि त्यात मोहरीचे तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग व जिरे घाला.
> आता बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण घालून परतून घ्या.
> त्यात हळद आणि थोडी लाल मिरची घालून परतावे आणि नंतर त्यात बटाटे घाला.
> मसाल्यामध्ये बटाटे घालून ५ मिनिटे शिजू द्या आणि नंतर फेटून तयार केलेले दही घाला.
> दही घालताच भाजी सतत ढवळत राहणे गरजेचे आहे, नाहीतर दही फटू शकते.
> सतत मध्यम आचेवर दही ढवळत राहा आणि नंतर १-२ उकळी येईपर्यंत ढवळत राहा.
> तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ ठेवू शकता. सुमारे १० मिनिटे उकळल्यानंतर, मीठ घाला.
> दही बटाटे आणखी दोन मिनिटे उकळू द्या, नंतर हिरवी कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.
> स्वादिष्ट दही आलू/ दही बटाटे तयार आहेत, ते तुम्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता.