मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chutney Recipe: झटपट बनवा दही आणि लसणाची टेस्टी चटणी, जेवणाची चव वाढवेल ही रेसिपी

Chutney Recipe: झटपट बनवा दही आणि लसणाची टेस्टी चटणी, जेवणाची चव वाढवेल ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 28, 2023 12:37 PM IST

Instant Recipe: जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्हाला चटणी बनवायची असेल पण जास्त वेळ नसेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. दही आणि लसणाची ही चटणी झटपट तयार होते आणि टेस्टी आहे.

दही आणि लसूणची चटणी
दही आणि लसूणची चटणी (Freepik)

Dahi and Garlic Chutney Recipe: हिवाळ्यात लसूण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. अनेक लोक हे खाण्याचा सल्ला देतात. तुम्हाला तुमच्या आहारात लसणाचा समावेश करायचा असेल तर तुम्ही याची चटणी बनवू शकता. दह्यासोबत बनवलेली लसणाची चटणी फक्त तुमच्या जेवणाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ही झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची दही आणि लसूणची चटणी

ट्रेंडिंग न्यूज

दही आणि लसूण चटणी बनवण्यासाठी साहित्य

- लसूणच्या १०-१५ पाकळ्या

- अर्धी वाटी दही

- २-३ हिरव्या मिरच्या

- अर्धा चमचा लाल तिखट

- १ चमचा आमचूर पावडर

- अर्धा चमचा धने पावडर

- २ चिमूट हळद

- जिरे

- काळे मीठ

- पाणी

- मीठ चवीनुसार

दही आणि लसूण चटणी बनवण्याची पद्धत

ही चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम लसूण सोलून घ्या. नंतर हे सोललेले लसूण खलबत्यात टाका. तसेच त्यात मीठ, लाल तिखट, हळद, धनेपूड, हिरवी मिरची घालावी. या सर्व गोष्टी नीट ठेचून बारीक करा. थोडं पाणी घालावं म्हणजे बारीक करताना मसाले बाहेर उडणार नाही. लक्षात ठेवा की हे पाणी फक्त मसाले उडू नये म्हणून थोडेसे घ्यावे. आता हा ठेचलेला लसूण बाजूला ठेवा. आता एका बाउलमध्ये दही काढा. त्यात थोडे काळे मीठ घालून दही चांगले फेटून घ्या. दही फेटून त्यात ठेचलेल्या लसणाचे मिश्रण घाला. नीट मिक्स करा. तुमची लसूण चटणी तयार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यावर तेल आणि जिऱ्याचा तडका देऊ शकता.

WhatsApp channel