मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Healthy Recipe: नाश्त्यात काळ्या हरभरा आणि रव्यापासून बनवा कटलेट, आहे आरोग्यदायीही रेसिपी!

Healthy Recipe: नाश्त्यात काळ्या हरभरा आणि रव्यापासून बनवा कटलेट, आहे आरोग्यदायीही रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 11, 2024 09:52 AM IST

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी काही चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय शोधत असाल तर हरभरा आणि रव्यापासून बनवली जाणारी टिक्की आवर्जून बनवा.

how to Make black gram and semolina tikki
how to Make black gram and semolina tikki (freepik)

Chana and Rava Cutlet: आपल्या दिवसाची सुरुवात हेल्दी करण्यासाठी आरोग्यदायी नाश्ता करणे गरजेचे आहे. अशा नाश्ता दिवसभर ऊर्जा देतो. याशिवाय पोट भरेल असा नाश्ता असणे गरजेचे आहे. रेगुलर उपमा, पोहे, उत्तपा, डोसा असे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आम्ही सांगत असलेल्या डिश ट्राय करा. यामुळे पटकन पुन्हा भूकही लागणार नाही. ही डिश आहे आरोग्यदायी आहे. तुम्ही नाश्तासाठी काळे हरभरे आणि रव्यापासून कटलेट बनवू शकता. काळा हरभरा फायबर आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. हे खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वारंवार भूक लागण्याची समस्याही दूर होते. चला जाणून घेऊया काळ्या हरभऱ्याचे कटलेट कसे बनवायचे.

लागणारे साहित्य

१ कप रात्रभर भिजवलेले काळे हरभरे, १/२ कप रवा, १ बारीक चिरलेला कांदा, १ छोटी चिरलेली हिरवी मिरची, १/२ टोमॅटो, १ लहान गाजर, १/२ बारीक चिरलेली सिमला मिरची, १ बटाटा, ताजी कोथिंबीर, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून धने पावडर, १/२ टीस्पून गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ, तेल तळण्यासाठी

जाणून घ्या कृती

> काळे हरभरे आणि रव्याचे कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात आधी काळे हरभरे प्रेशर कुकरमध्ये घालून ३ शिट्ट्या वाजवून छान शिजवून घ्या.

> यानंतर उकडलेले हरभरे मॅश करा. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची आणि बटाटा एकत्र करून मळून घ्या.

> आता भिजवलेला बारीक रवा आणि मसाले घालून १५-२० मिनिटे हे मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवा. थोडा वेळ सेट होऊ द्या.

> यानंतर या मिश्रणातून कटलेट बनवा.

> कढईत तेल गरम करून त्यात कटलेट तळून घ्या. छान खरपूस हे कटलेट तळून घ्या.

> कटलेट केचप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

 

WhatsApp channel