मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dosa Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी डोसा, ट्राय करा ही रेसिपी

Dosa Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी डोसा, ट्राय करा ही रेसिपी

Jun 23, 2024 10:04 AM IST

Breakfast Recipe: रविवारची टेस्टी सुरुवात करायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रवा आणि बटाट्यापासून डोसा कसा बनवायचा ते पाहा.

रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी डोसा रेसिपी
रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी डोसा रेसिपी (freepik)

Crispy Rava and Potato Dosa Recipe: रविवारचा दिवस निवांत असला तरी सकाळच्या नाशत्याची गडबड असते. अशात जर तुम्हाला काहीतरी टेस्टी नाश्ता झटपट बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. रवा आणि बटाट्यापासून बनवलेला डोसा टेस्टी तर आहेच शिवाय तो काही मिनिटात तयार होतो. हे बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि चटणीबरोबर खायला चविष्ट लागतात. तसेच सुट्टीचा दिवस खास बनवण्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी डोसा कसा बनवायचा.

रवा आणि बटाट्याचा डोसा बनवण्यासाठी साहित्य

- रवा अर्धा कप

ट्रेंडिंग न्यूज

- २ बटाटे

- २ हिरव्या मिरच्या

- मीठ अर्धा चमचा

- अडीच कप पाणी

- अर्धा कप तांदळाचे पीठ

- बारीक चिरलेला कांदा

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- जिरे

- बारीक केलेली लाल मिरची

रवा आणि बटाट्याचा डोसा बनवण्याची पद्धत

रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे सोलून धुवून घ्या. आता त्याचे चौकोनी तुकडे करा. नंतर ग्राइंडर जारमध्ये बटाट्याचे तुकडे, हिरवी मिरची, मीठ घाला. पाणी घालून बारीक पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये अर्धा कप रवा आणि अर्धा कप तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा घालू शकता. आता हे पीठ थोडे पातळ करा. जेणेकरून चमच्याने ते पसरवता येईल. नॉनस्टिक पॅनवर चमचाच्या साहाय्याने पीठ टाका आणि नीट पसरवा. 

अवघ्या एका मिनिटात डोसा तयार होईल. तुमचे टेस्टी रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी डोसा तयार आहे. कांद्याची चटणी, टोमॅटोची चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

WhatsApp channel