मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  संध्याकाळच्या चहासोबत घ्या क्रिस्पी आलू टिक्कीचा आस्वाद

संध्याकाळच्या चहासोबत घ्या क्रिस्पी आलू टिक्कीचा आस्वाद

Hiral Shriram Gawande HT Marathi
Sep 07, 2022 05:34 PM IST

Monsoon Recipes : पावसाच्या सरी आणि वाफाळलेल्या चहासोबत काही तरी चटपटीत खायची इच्छा होत आहे, तर बनवा क्रिस्पी आलू टिक्की.

आलू टिक्की
आलू टिक्की

Aloo Tikki Recipe : संध्याकाळची थोडीशी भूक शांत करण्यासाठी आणि चहाचा आनंद वाढवण्यासाठी ही चवदार आलू टिक्की रेसिपी ट्राय करुन पहा. चटपटीत खाण्याची आवड असलेल्या लोकांमध्ये ही सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड रेसिपी मानली जाते. विशेष म्हणजे आलू टिक्की लहानांपासून मोठ्यांना खूप आवडते. याला तुम्ही बटाटा कटलेट असेही नाव देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया ही टेस्टी रेसिपी.

आलू टिक्की बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- १ कप उकडलेले बटाटे

- अर्धा कप उकडलेले हिरवे वाटाणे

- १ टीस्पून चाट मसाला

- १ १/२ टीस्पून लिंबाचा रस

- अर्धा टीस्पून लाल तिखट

- कोथिंबीर

- चवीनुसार मीठ

- तळण्यासाठी तेल

आलू टिक्की बनवण्याची पद्धत

आलू टिक्की बनवण्यासाठी प्रथम उकळलेले बटाटे सोलून चांगले मॅश करून घ्या. आता सर्व साहित्य एका बाउल मध्ये टाका आणि चांगले मिक्स करा. आता हा संपूर्ण बटाटा मसाला ६ भागांमध्ये विभागून त्याचे गोल गोळे बनवून घ्या. हाताने दाबून थोडा टिक्कीसारखा आकार द्या. एक नॉनस्टिक पॅन किंवा तवा गरम करा. त्यात थोडे तेल टाकून ग्रीस करुन घ्या. आता टिक्की ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी ग्लोडन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. आता गरमा गरम टिक्की कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढा आणि हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

WhatsApp channel