मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  चटपटीत खायची इच्छा असेल तर ट्राय करा क्रिस्पी पालक चाट

चटपटीत खायची इच्छा असेल तर ट्राय करा क्रिस्पी पालक चाट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Sep 12, 2022 05:32 PM IST

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चाट खाल्ले असतील. पण कधी पालकाचे चाट खाल्ले आहे का?

क्रिस्पी पालक चाट
क्रिस्पी पालक चाट

Palak Chaat Recipe : पालक चाट हा संध्याकाळच्या चहासाठी एक उत्तम नाश्ता आहे. पालकाच्या पानांवर बेसनाच्या पिठाचा लेप करून, तळलेले आणि नंतर दही, चटणी आणि मसाल्यांसोबत सर्व्ह केले जाते. तुम्हाला काही वेगळ्या रेसिपीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बहुतेक मुलांना पालक खायचा नसतो, म्हणून तुम्ही ही डिश बनवून त्यांना खायला देऊ शकता. चला तर जाणून घेऊया कशी बनवायचे पालक चाट

पालक चाट बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- १ कप बेसन

- ७ ते ८ पालक पाने

- ४ चमचे दही

- २ चमचे कांदा (चिरलेला)

- २ चमचे टोमॅटो (चिरलेला)

- १ हिरवी मिरची

- २ टीस्पून चिंचेची चटणी

- २ टीस्पून पुदिन्याची चटणी

- १ टीस्पून बुंदी

- १ टीस्पून डाळिंबाचे दाणे

- १ टीस्पून शेव

- १/२ टीस्पून ओवा

- चिमूटभर काळे मीठ

- चिमूटभर जिरे

- चिमूटभर लाल तिखट

- चिमूटभर हळद

- १ टीस्पून मीठ

- २ कप पाणी

 

पालक चाट बनवण्याची पद्धत

एका बाऊल मध्ये एक वाटी बेसन घ्या आणि त्यात मीठ, ओवा आणि पाणी घाला. गुळगुळीत पीठ बनवण्यासाठी ते फेटून घ्या. आवश्यक असल्यास आणखी पाणी घाला. त्यात चिमूटभर हळद घालून पुन्हा मिक्स करा. आता ताजी आणि स्वच्छ पालकाची पाने घ्या, ती भिजवून घ्या आणि बेसनाच्या मिश्रणाने पूर्णपणे कोट करा आणि तळण्यासाठी पॅनमध्ये ठेवा. तळलेली, कुरकुरीत पालकाची पाने एका प्लेटवर ठेवा आणि त्यावर थोडे दही घाला. सर्व मसाले आणि चटण्या घ्या आणि त्यांच्याबरोबर डिश सजवा. एका वेळी एक मसाला घाला. सुरुवातीला काळे मीठ, जिरे आणि लाल तिखट, त्यानंतर चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी टाका. आपण आपल्या चवीनुसार मसाल्यांचे प्रमाण देखील वापरू शकता.

WhatsApp channel