Crispy Lachha Pakora Recipe: संध्याकाळी चहासोबत काहीतरी स्नॅक्स खाण्याची इच्छा असेल पण रोज काय बनवायचे हा प्रश्न अनेकदा महिलांच्या मनात येतो. जर तुम्हाला सुद्धा काहीतरी झटपट तयार होणारे आणि टेस्टी स्नॅक्स हवे असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. लच्छा पकोडे हे खायला टेस्टी तर आहेतच शिवाय ते झटपट तयार होतात. विशेष म्हणजे लच्छा पकोडा कोणत्याही पूर्व तयारी शिवाय पटकन बनवता येतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते अगदी कमी वेळात अगदी कुरकुरीत तयार केले जातात. चला तर मग जाणून घेऊया शेफ स्टाइल क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची रेसिपी.
- एक कप बेसन
- अर्धा कप मैदा
- दोन ते तीन बटाटे
- दोन ते तीन कांदे
- बारीक चिरलेला पालक
- हिरवी मिरची
- कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने
- रेड चिली फ्लेक्स
- धणे पावडर
- चवीनुसार मीठ
- एक चमचा ओवा
- चिमूटभर हिंग
- एक चिमूटभर बेकिंग सोडा
हे बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे चांगले धुवून घ्या. नंतर या बटाट्याचे साल न काढता ते पातळ आणि लांब आकारात कापून घ्या. तसेच कांदा सोलून स्वच्छ धुवा आणि उभा चिरून घ्या. आता हव्या त्याप्रमाणे बारीक चिरलेला पालक घाला. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घाला. आता त्यात मसाले मिक्स करा. मसाल्यात धने पूड घाला. तसेच चिमूटभर बेकिंग सोडा टाका. आता हे सर्व काही चांगले मिक्स करा. आता याचे बॅटर तयार करण्यासाठी यात हाताच्या मदतीने थोडे थोडे पाणी घालावे. जेणेकरून सर्व भाज्या ओल्या होऊन एकमेकांना चिकटतील. जास्त पाण्यामुळे पकोडे कुरकुरीत होणार नाहीत. त्यामुळे थोडे थोडे पाणी टाका. आता कढईत तेल टाकून ते गरम करा.
नंतर मंद आचेवर तेलात बॅटरचे पकोडे टाकून तळून घ्या. थोडे शिजल्यावर हे पकोडे बाहेर काढा आणि नंतर परत गरम तेलात तळा. यामुळे पकोडे एकदम क्रिस्पी होतील. तुमचे टेस्टी लच्छा पकोडे तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.