Crispy Garlic Paneer Recipe: अनेक वेळा रात्रीच्या जेवणात खूप हेवी जेवण करायची इच्छा नसते. अशा वेळी हलकं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पनीर खायला सर्वांनाच आवडते. तुम्हाला सुद्धा पनीर खायला आवडत असेल तर डिनरसाठी गार्लिक पनीर बनवू शकता. हे तुम्ही पोळी, पराठा किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. याची चव चिली पनीर सारखी लागेल पण हे बनवणे त्यापेक्षा सोपे आहे. जाणून घ्या क्रिस्पी गार्लिक पनीर कसे बनावायचे.
- पनीर क्यूब मध्ये कापलेले
- कॉर्न फ्लोअर
- कांदा चौकोनी तुकड्यांमध्ये कापलेले
- हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या
- आले आणि लसूण किसलेले
- लोणी किंवा तूप
- टोमॅटो सॉस
- ग्रीन चिली सॉस (शक्य नसेल तर स्किप करू शकता)
- काळी मिरी
- लाल तिखट
- मीठ
सर्वप्रथम पनीरचे तुकडे कोरड्या कॉर्न फ्लोरमध्ये कोट करून घ्या. आता हे तुकडे तूप किंवा लोणीमध्ये तळून घ्या. तळताना यात थोडे मीठ घालावे. आता आपल्या आवडीनुसार कढईत रिफाइंड तेल किंवा तूप घ्या. त्यात कांद्याचे तुकडे टाकून तळून घ्या. आता त्यात किसलेले आले आणि लसूण घालावे. गॅस मध्यम ठेवा. पेस्ट भाजायला लागल्यावर त्यात मीठ, हिरवी मिरची, लाल तिखट, काळी मिरी पावडर घाला. आता यात थोडा टोमॅटो सॉस, चिली सॉस घाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रेड चिली सॉस सुद्धा घालू शकता. किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस हे स्किप देखील करू शकता. आता यात तळलेले पनीरचे तुकडे घाला. हे सर्व नीट मिक्स करून घ्या.
तुमचे गार्लिक पनीर तयार आहे. हे पनीर तुम्ही असेच स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. तसेच तुम्ही पराठ्याला हिरवी चटणी आणि कांदा टाकून त्यात हे पनीरचे स्टफिंग टाकून रोल बनवूनही खाऊ शकता.
संबंधित बातम्या