Crispy Atta Dosa Recipe: सकाळची धावपळ आणि रोज चवदार नाश्ता खाण्याची घरच्यांची मागणी, तुमच्याकडे सुद्धा रोज अशीच परिस्थिती असते का? अशा वेळी रोज काय बनवावं हा मोठा प्रश्न महिलांसमोर असतो. अशा परिस्थितीत मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी दहा मिनिटांत चवदार नाश्ता करण्याची रेसिपी सांगितली आहे. ही रेसिपी १० मिनिटात तयार होते आणि खायला सुद्धा टेस्टी आहे. चला तर मग गव्हाचे पीठ म्हणजेच आटा डोसा बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
- एक कप गव्हाचे पीठ
- दोन चमचे तांदळाचे पीठ
- दोन चमचे रवा
- एक कांदा बारीक चिरलेला
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- अर्धा चमचा जिरे
- काळी मिरी
- दोन कप पाणी
- मीठ चवीनुसार
हा डोसा बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात अर्धा कप गव्हाचे पीठ घ्या. त्यात प्रत्येकी दोन चमचे रवा आणि तांदळाचे पीठ घालावे. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. बारीक केलेली काळी मिरी, जिरे आणि मीठ घाला. पाणी घालून पातळ पीठ तयार करा. दहा मिनिटे हे पीठ बाजूला ठेवा. नंतर त्यात थोडे पाणी घालून बॅटर नीट मिक्स करावे. डोसाचे पीठ खूप पातळ रनिंग असावे हे लक्षात ठेवा. आता तवा गरम करून त्यावर बॅटर टाका आणि डोसा तव्यावर पसरवून घ्या. हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत शिजू द्या. तुमचा क्रिस्पी आटा डोसा तयार आहे. गरमा गरम डोसा चटणीसोबत सर्व्ह करा.
संबंधित बातम्या