मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Corn Idli Recipe: नाश्त्यात बनवा कॉर्न इडली, आहे पौष्टिकतेने परिपूर्ण डिश!

Corn Idli Recipe: नाश्त्यात बनवा कॉर्न इडली, आहे पौष्टिकतेने परिपूर्ण डिश!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 10, 2024 10:48 AM IST

Breakfast Recipes: जर तुम्ही नाश्त्यासाठी आरोग्यदायी पर्याय शोधत असाल तर त्यात कॉर्न इडलीचा पर्याय ट्राय करू शकता.

how to make Corn Idli know Recipe
how to make Corn Idli know Recipe (Pixabay )

Healthy Breakfast: हिवाळ्यात मक्याची रोटी आणि सरसो का साग आवर्जून खाल्ले जाते. ही डिश फारच टेस्टी आणि फेमस आहे. मक्का म्हणजे कणसाचे पीठ. हे पीठ चवीला छान लागतेच पण त्यात अनेक पोषक घटक असतात, जे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात, परंतु आरोग्याच्या बाबतीत, आपल्याला तेच पदार्थ खाण्याचा अनेक वेळा कंटाळा येतो. तुम्हालाही मक्याच्या रोटीचा कंटाळा आला आहे, मग आज आम्ही तुम्हाला मक्यापासून बनवलेल्या आणखी एका डिशबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही नाश्त्यामध्ये समावेश करू शकता. ही डिश आहे कॉर्न फ्लोअर इडली. या इडलीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. चला जाणून घेऊयात रेसिपी…

लागणारे साहित्य

कॉर्न फ्लोअर - २ वाट्या, उडीद डाळ - १ टेबलस्पून, हरभरा डाळ - १ टेबलस्पून, दही - १/२ वाटी, जिरे - १ टीस्पून, हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरून), मोहरी - १ टीस्पून कढीपत्ता - ५-६ (लहान तुकडे करा), कोथिंबीर - २ चमचे (बारीक चिरून), इनो - १ टीस्पून, तेल - १ टीस्पून, चवीनुसार मीठ

जाणून घ्या कृती

> सर्वात आधी पॅन गरम करायला ठेवा. यानंतर त्यात तेल घाला.

> त्यात मोहरी आणि जिरे टाका. त्यानंतर उडीद आणि हरभरा डाळ घालून सोनेरी होईपर्यंत परता.

> नंतर त्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला. त्यानंतर कॉर्न फ्लोअर. सतत ढवळत असताना कॉर्न फ्लोअर २ ते ३ मिनिटे भाजून घ्या.

> एक मोठा बाउल घ्या. त्यात कॉर्न फ्लोअर घाला. त्यासोबत दही घालावे. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावे.

> ऋतू म्हणजे हिवाळा ज्यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्याही त्यात घालू शकता.

> शेवटी एनो पावडर घालून चांगले मिसळा आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.

> इडलीच्या साच्याला तेलाने हलके ग्रीस करा. भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा.

> इडली बनवण्यापूर्वी पिठात परत एकदा चांगले मिसळा आणि मग साच्यात भरा.

> आता वाफेवर इडली नीट शिजवून घ्या.

> तयार झाल्यावर साच्यातून इडली काढून तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.

 

WhatsApp channel