Corn Chaat Recipe: अनेक लोकांना संध्याकाळी चहासोबत स्नॅक्स खायला आवडते. तर बऱ्याचदा संध्याकाळची थोडीशी भूक भागवण्यासाठी विविध पदार्थ आवडीने खाल्ले जातात. बहुतांश लोकांना संध्याकाळच्या नाश्त्यात अनेक वेळा काहीतरी चटपटीत स्नॅक्स खायची इच्छा होते. अशा वेळी ते भेळ पुरी, पाणी पुरी, शेव पुरी यासारख्या चाटचा आस्वाद घेतात. पण तुम्हाला हे चाट खायचे नसतील आणि काहीतरी वेगळं खायचं असेल तर झटपट कॉर्न चाट बनवा. हे बनवणे सोपे आहे. हे खायला खूप टेस्टी आहे आणि तुमची चटपटीत खायची क्रेविंग पूर्ण करू शकते. चला तर मग जाणून घ्या चटपटीत कॉर्न चाट कसे बनवायचे.
- २ कप मक्याचे दाणे
- १ मध्यम आकाराचा कांदा चिरलेला
- १ मध्यम आकाराचे टोमॅटो चिरलेले
- १ मध्यम आकाराची हिरवी शिमला मिरची चिरलेली
- कोथिंबीर
- लिंबाचा रस
- अर्धा चमचा तूप
- मीठ चवीनुसार
- १ टीस्पून ताजी बारीक केलेली काळी मिरी पावडर
- १ टीस्पून चाट मसाला
कॉर्न चाट बनवण्यासाठी मक्याचे दाणे मध्यम आचेवर मऊ होईपर्यंत उकळून घ्यावेत. नंतर एक पॅनमध्ये तूप घाला आणि गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी शिमला मिरची घाला. यासोबत चाट मसाला, मीठ, काळी मिरी घाला. आता मिक्स करा आणि झाकून मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवा. ही नीट शिजल्यावर त्यात उकडलेला मका घालून मिक्स करा. आता त्यात लिंबाचा रस घाला. चांगले मिक्स करून थोडा वेळ शिजवावे. तुमचे कॉर्न चाट तयार आहे. त्यावर कोथिंबीरने गार्निश करा आणि लगेच सर्व्ह करा.