Collagen Boosting Cream: आजकाल सगळेच आपल्या त्वेचेची काळजी घेतात. चेहऱ्याच्या त्वचेची तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेची विशेष काळजी घेतली नाही तर त्वचेचे ग्लो निघून जातो. यामुळे चेहरा कोमेजलेला दिसतो. याच कारणांमुळे त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरु झाला आहे. या दिवसात बाहेर जातो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर धूळ आणि घाण चिकटते याशिवाय त्वचा टॅनही होते. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. तुमच्या त्वचेतील कोलेजनची पातळीही कमी होते. त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी कोलेजनची पातळी वाढवणे आवश्यक आहे. हे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करते. कोलेजनची पातळी वाढवण्यासाठी अनेक महागड्या क्रिम उपलब्ध आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा क्रिमबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही घरी बनवू शकता आणि ती बनवण्यासाठी खूप कमी खर्च येईल.
घरी कोलेजन बूस्टिंग क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला अनेक घटकांची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त एलोवेरा जेल, बदाम तेल, व्हिटॅमिन ई तेल, मध आणि कोलेजन पावडरची आवश्यकता असेल.
प्रथम एका भांड्यात थोडे खोबरेल तेल आणि १ चमचे बदाम तेल घालून गरम करा. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. ते थंड झाल्यावर त्यात २ चमचे कोरफड जेल, १ चमचा व्हिटॅमिन ई घाला. तेल आणि १ चमचे मध घालून चांगले मिसळा. ही पेस्ट किमान १-२ मिनिटे मिक्स करा. त्यानंतर १ चमचा कोलेजन पावडर घाला आणि पुन्हा ढवळून घ्या. आता एअर टाईट बॉक्समध्ये ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तुमची क्रीम तयार आहे. तुम्हाला लक्षातच आलं असेल की कोलेजन बूस्टिंग क्रीम बनवणे फार कठीण नाही. ही क्रीम करण्यासाठी १० मिनिटे लागतील.
ही क्रीम लावण्याची योग्य वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी. जेव्हा तुम्ही झोपायला जात असाल तेव्हा तुमचा चेहरा फेसवॉश करून स्वच्छ करा. त्यानंतर चेहरा कोरडा करा. आता बनवलेली ही क्रीम चेहऱ्यावर लावून किमान २-३ मिनिटे मसाज करा. त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसातच दिसू लागेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या