Coffee Ice Cream Recipe: उन्हाळा सुरू होताच आपल्याला अनेकदा थंड पदार्थ खावेसे वाटतात. अशा गोष्टींमध्ये आइस्क्रीमचा प्रथम उल्लेख केला जातो. लहान मुले असो वा मोठे, आईस्क्रीमची गोड चव आणि थंडपणा सर्वांनाच आवडतो. ऊन आणि उष्णतेपासून आराम देणारे हे आइस्क्रीम अनेक फ्लेवर्समध्ये येते. तथापि कॉफी आइस्क्रीमची गोष्ट अनोखी आहे. कॉफी आइस्क्रीम ही एक अप्रतिम डेझर्ट रेसिपी आहे, जी कॉफी आणि क्रीम प्रेमींसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे हे काही घटकांच्या मदतीने घरी सहज बनवता येते. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या चविष्ट कॉफी आईस्क्रीम कसे बनवायची.
- २ टेबलस्पून कॉफी पावडर
- १/२ कप साखर
- १ कप दूध
- २ कप फुल क्रीम
- २ चमचे व्हॅनिला इसेन्स
कॉफी आईस्क्रीम बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात साखर आणि क्रीम टाका. साखर विरघळेपर्यंत आणि क्रीम फ्लफी होईपर्यंत फेटून घ्या. आता त्यात व्हॅनिला इसेन्स सोबत दूध घालून कॉफी मिक्स करा. या सर्व गोष्टी नीट मिक्स करा. नंतर एका भांड्यात ठेवून फ्रीजरमध्ये फ्रीज होण्यासाठी ठेवा. जेव्हा कॉफी आइस्क्रीम पूर्णपणे तयार होईल तेव्हा ते आइस्क्रीम स्कूपने बाहेर काढा. त्यावर कॉफी पावडर शिंपडा आणि थंडगार सर्व्ह करा.