Coffee Hair Mask: बहुतेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर कॉफी प्यायला आवडते. त्याचा सुगंध लोकांची सकाळी एनर्जेटिक करते. पण तुम्हाला माहित आहे का की कॉफी केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. कॉफीमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराबरोबरच केसांसाठीही फायदेशीर असतात. केस मजबूत करण्यासाठी तुम्ही कॉफीपासून विविध प्रकारचे हेअर मास्क बनवू शकता.
हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला १ चमचा कॉफी, १ चमचा लिंबाचा रस आवश्यक आहे. दोन्ही साहित्य चांगले मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करा. आता स्वच्छ केसांवर हा मास्क लावा आणि २०-३० मिनिटे राहू द्या. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून एकदा हा मास्क लावा.
लांब आणि मजबूत केसांसाठी १ चमचा कॉफी आणि १ चमचा वितळलेले खोबरेल तेल घ्या. हे मिक्स करून केसांवर लावा. नंतर ३० मिनिटे ते १ तास केसांवर राहू द्या. त्यानंतर केस शॅम्पूने धुवून घ्यावा. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरा.
केसांमध्ये ओलाव्याची कमतरता असेल तर १ चमचा कॉफी आणि २ चमचे दही चांगले मिक्स करा. केसांवर लावल्यानंतर साधारण ३० मिनिटे ठेवा. चांगल्या परिणामांसाठी दर २ आठवड्यातून एकदा याचा वापर करा.
केसांमध्ये अतिरिक्त चमक हवी असेल तर १ चमचा कॉफी आणि १ चमचा मध मिक्स करा. आता हलक्या ओल्या केसांवर हा मास्क लावा. २०-३० मिनिटे राहू द्या. नंतर केस शॅम्पूने धुवून घ्यावा.
जर तुमचे केस खूप पातळ असतील तर दाट होण्यासाठी १ चमचा कॉफी आणि १ अंड्याचा पांढरा भाग घ्या. दोन्ही चांगले एकत्र मिक्स करा. नंतर २०-३० मिनिटे सोडा. त्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यावा.
जर तुम्ही वेळोवेळी केस कापत नसाल तर तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या नक्कीच होईल. याचा सामना करण्यासाठी केसांना कॉफी मास्क लावा. यासाठी १ चमचा कॉफी आणि १ चमचा मेयोनीज घ्या. नंतर ते ३० मिनिटे ठेवा. दर २ आठवड्यातून एकदा लावा. याशिवाय वेळोवेळी केसांचे हलकी कटिंग करून घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)