Coconut Shikanji: या उन्हाळ्यात ट्राय करा कोकोनट शिकंजी, टेस्टसोबत हेल्थ देईल ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coconut Shikanji: या उन्हाळ्यात ट्राय करा कोकोनट शिकंजी, टेस्टसोबत हेल्थ देईल ही रेसिपी

Coconut Shikanji: या उन्हाळ्यात ट्राय करा कोकोनट शिकंजी, टेस्टसोबत हेल्थ देईल ही रेसिपी

May 31, 2024 11:10 PM IST

Summer Special Drink Recipe: उन्हाळ्यात संध्याकाळी चहा कॉफी ऐवजी काही थंड घ्यायची इच्छा असेल तर नारळाची शिकंजी ट्राय करा. झटपट तयार होणारी पहा ही सोपी रेसिपी.

कोकोनट शिकंजीची रेसिपी
कोकोनट शिकंजीची रेसिपी (freepik)

Coconut Shikanji Recipe: उन्हाळ्यात लोकांना थंड पेय प्यायला आवडतात. गर्मीच्या दिवसात थंड लिंबू सरबत, लस्सी, फळांचे ज्यूस आवडीने पिले जातात. पण तुम्ही कशी कोकोनट शिकंजी ट्राय केली आहे का? नेहमीच्या साध्या नारळ पाणी ऐवजी यावेळी ट्राय करा कोकोनट शिकंजी. हे तुम्हाला टेस्ट देण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तसेच ही रेसिपी बनवायला खूप सोपी आणि झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या घरी टेस्टी आणि हेल्दी कोकोनट शिकंजी कशी बनवायची.

कोकोनट शिकंजी बनवण्यासाठी साहित्य

- १ ग्लास नारळ पाणी

- २ चमचे साखर बारीक केलेली

- चिमूटभर काळे मीठ

- १ चमचा आल्याचा रस

- २ लिंबू

- १ ग्लास सोडा वॉटर (साधेपाणी देखील वापरू शकता)

कोकोनट शिकंजी बनवण्याची पद्धत

ही समर स्पेशल ड्रिंक बनवण्यासाठी प्रथम एका ग्लासमध्ये नारळाचे पाणी काढून घ्या. आता त्यात बारीक केलेली साखर टाकून मिक्स करा. आता दुसऱ्या ग्लासमध्ये सोडा वॉटर आणि लिंबू टाका. तुम्हाला सोडा वॉटर नको असेल तर तुम्ही साधे पाणी सुद्धा वापरु शकता. आता हे नीट मिक्स करा. नंतर त्यात नारळाचे पाणी टाका. चांगले मिक्स केल्यानंतर हे थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. साधारण २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवा. तुमची कोकोनट शिकंजी तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर काळे मीठ आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा.

Whats_app_banner