Healthy Recipe: भारतीय आहारात भाताला विशेष महत्त्व आहे. अनेकांचा जेवण भाताशिवाय पूर्ण होतंच नाही. अनेकांना तर भात फार आवडतो. तुम्हीही भात खाण्याचे शौकीन असाल तर आम्ही एक रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही उत्तम आहे. दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तुम्ही हा भात कधीही खाऊ शकता. हे खाल्ल्याने तुम्ही मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. नारळ हा अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा खजिना आहे. त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, निरोगी चरबी, मॅग्नेशियम, तांबे, सेलेनियम, मँगनीज, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम सारखे घटक असतात. नारळाचा अप्रतिम टेस्टी भात बनवण्यासाठी जाणून घ्या झटपट रेसिपी जाणून घेऊयात.
सुक्या नारळ खवून घ्या – २ वाट्या, बासमती तांदूळ – १ वाटी, शेंगदाणे – ४ चमचे, काजू – ८ ते १०, चणा डाळ (भिजवलेली) – ४ चमचे, उडदाची डाळ (भिजलेली) – ४ चमचे, मोहरी – १ टीस्पून, जिरे - १ टीस्पून, कढीपत्ता - ५ ते ६, लाल मिरची - १, हिरवी मिरची (बारीक चिरलेली) - २, मीठ (चवीनुसार), तूप - २ ते ३ चमचे
> तांदूळ धुवून स्वच्छ करा. नंतर १५ मिनिटे किंवा अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.
> कढईत तूप गरम करा.
> प्रथम शेंगदाणे व काजू घालून हलके परतून घ्यावे व बाजूला ठेवावे.
> आता त्याच पातेल्यात आणखी एक चमचा तूप घाला. मोहरी, जिरे, कढीपत्ता, भिजवलेले उडीद आणि चणाडाळ घालून परतून घ्या.
> नंतर त्यात भाजलेले काजू आणि शेंगदाणे, किसलेले खोबरे मिसळा. आणखी २ मिनिटे हे नीट परतून घ्या.
> नंतर त्यात तांदूळ आणि चवीनुसार मीठ घाला. आणखी पाच मिनिटे शिजवा.
> आता हे संपूर्ण मिश्रण प्रेशर कुकरमध्ये ठेवा, सुमारे १.५ कप पाणी घाला आणि २ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
> नारळ भात तयार आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)