Coconut Rabri Recipe: ऋतु कोणताही असो, डेझर्ट खाल्ल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटते. पण रोज एकाच प्रकारचे गोड किंवा नेहमीचे गोड पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल तर कोकोनट रबडीची ही टेस्टी रेसिपी ट्राय करून बघा. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. या रेसिपीची विशेषता म्हणजे घरी असलेल्या जुन्या दुधाने बनवली तरी त्याची चव खूपच अप्रतिम राहते. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घेऊया ही टेस्टी डेझर्ट कोकोनट रबडी बनवण्याची सोपी पद्धत
- १ लिटर फुल क्रीम दूध
- १/२ कप किसलेले नारळ
- १/२ कप खवा
- साखर चवीनुसार
- काजू
- बदाम चिरलेले
- पिस्ता चिरलेले
- वेलची
- १० केशरचे धागे
- गुलाबाच्या पाकळ्या (गार्निशसाठी)
टेस्टी कोकोनट रबडी बनवण्यासाठी प्रथम एका छोट्या भांड्यात १० ते १५ काजू गरम पाण्यात भिजवून १५ मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर एका पॅनमध्ये फुल क्रीम मिल्क टाकून ते उकळेपर्यंत गरम करावे. यानंतर गॅसची फ्लेम मंद करून दूध ३/४ प्रमाण होईपर्यंत शिजवावे. हे करत असताना दूध जळू नये किंवा तळाला लागू नये म्हणून सतत ढवळत राहा. आता दुधात केशर धागे आणि खवा मिक्स करा आणि आणखी काही काळ ढवळत राहा. पॅनच्या काठावर दूध चिकटायला लागल्यावर ते काढून टाका. आता भिजवलेले काजू ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. आता मिश्रणात साखर आणि किसलेला नारळ घालून चांगले मिक्स करा. दूध घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता त्यात काजूची पेस्ट घाला आणि त्याचा कच्चापणा संपेपर्यंत शिजवत राहा. आता मिश्रणात बारीक केलेली वेलची घालून चांगले मिक्स करा.
गॅस बंद करा आणि रबडी थंड होऊ द्या. तुमची टेस्टी कोकोनट रबडी तयार आहे, सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा आणि वर चिरलेले पिस्ता, चिरलेले बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करा. तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या नको असेल तर स्किप करू शकता.
संबंधित बातम्या