मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coconut Gujiya Recipe: मावा आणि खवा विसरा! यावेळी बनवा नारळाची गुजिया, जाणून घ्या रेसिपी!

Coconut Gujiya Recipe: मावा आणि खवा विसरा! यावेळी बनवा नारळाची गुजिया, जाणून घ्या रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 18, 2024 11:57 PM IST

Holi Recipe: रेगुलर गुजियापेक्षा यंदा होळीच्या सणाला बनवा नारळाचं स्टफिंग असलेल्या गुजिया.

how to make coconut gujiya recipe
how to make coconut gujiya recipe (freepik)

Indian Sweets Recipe: होळी म्हंटल की रंग, आनंद आलाच. पण याशिवाय या सणाला खास मिठाई पण बनवल्या जातात. गुजियाशिवाय होळी कशी साजरा होणार? या प्रश्न पडतोच. होळी म्हंटल गुजिया आल्याचं. पण, सण-उत्सवात मावा आणि खव्यात इतकी भेसळ होते की, कधी कधी त्यापासून बनवलेले गोड पदार्थ खायला भीती वाटते. पण गुजियाशिवाय होळीचा रंग फिका पडतो. त्यामुळे या वर्षी होळीमध्ये तुम्ही या पद्धतीने गुजिया तयार करून खाऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. आम्ही सांगितलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही सहज गुजिया बनवू शकता आणि बराच वेळ खाऊ शकता. तसेच, त्यात भेसळ आहे की नाही याची काळजी करण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया गुजियाची रेसिपी.

कशा बनवायच्या गुजिया?

> सर्वप्रथम मैद्यामध्ये थोडे तेल, खाण्याचा सोडा, मीठ आणि कोमट पाणी घालून मळून घ्या.

> झाकण ठेवून २० मिनिटे असेच ठेवा.

> यानंतर नारळ किसून घ्या.

> त्यात पिठीसाखर, काही ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर घाला.

> सगळं मिक्स केल्यावर असेच ठेवा.

>आता पिठाचा गोळा बनवून तो लाटून घ्यावा.

> नंतर त्यात नारळ टाका.

> तुम्ही यासाठी गुजिया मेकर देखील वापरू शकता.

> आता कढईत तेल टाका आणि उकळत्या तेलात गुज्या तळून घ्या.

> तुमच्या गुजिया तयार आहेत.

अशाप्रकारे तुम्ही यंदाच्या होळीच्या सणाला वेगळ्या प्रकारच्या गुजिया बनवून खाऊ शकता. हा खोबऱ्याचा गुजिया तुम्ही सहज तयार करून खाऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

 

WhatsApp channel

विभाग