उपवासात गोड खायची इच्छा होतेय? सोप्या पद्धतीने बनवा नारळाची बर्फी
Chaitra Navratri Fast Recipe: नवरात्रीच्या उपवास दरम्यान जर गोड खायची इच्छा होत असेल तर नारळाची बर्फी बनवा. खूप सोपी आहे ही रेसिपी.
Coconut Barfi Recipe: नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. काही लोक नवरात्रीच्या नऊ दिवस उपवास ठेवतात. तर काही लोक पहिल्या आणि आठव्या दिवशी उपवास करतात. तुम्हाला उपवासात काहीतरी गोड खायची इच्छा होत असेल तर तुम्ही नारळाची बर्फी बनवू शकता. पहा ही बनवण्याची सोपी रेसिपी.
ट्रेंडिंग न्यूज
नारळाची बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला लागेल...
- किसलेले नारळ
- दूध
- कंडेन्स्ड मिल्क
- पिस्ता, काजू आणि बदाम
- वेलची पावडर
कसे बनवावे
- हे बनवण्यासाठी प्रथम पिस्ता, काजू आणि बदाम कोरडे भाजून घ्या. हे तोपर्यंत भाजा जोपर्यंत ते चांगले क्रंची होत नाही. नंतर एका प्लेटमध्ये काढा आणि थंड झाल्यावर कापून घ्या.
- आता एका कढईत किसलेले खोबरे दुधासोबत घालून चांगले मिक्स करा. त्यात कंडेन्स्ड मिल्क सुद्धा टाका. चांगले मिक्स करा. त्यात गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
- मंद ते मध्यम आचेवर शिजवा. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घालून मिक्स करा.
- एका प्लेटला तूप लावून त्यावर नारळाचे सर्व मिश्रण काढून घ्या. ते चांगले दाबा आणि नंतर त्यावर ड्राय रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स घाला.
- आता बर्फी बनण्यासाठी थोडा वेळ राहू द्या. सुमारे एक तास ठेवल्यानंतर ते घट्ट होईल. या दरम्यान त्याचे तुकडे करा.
- तुमची नारळ बर्फी तयार आहे. तुम्ही यावर सिल्व्हर फॉइल सुद्धा लावू शकता.