Healthy breakfast: रात्री उरलेल्या चपात्यांपासून बनवा चुरमा, झटपट तयार होईल नाश्ता!-how to make churma from leftover chapattis know breakfast recipe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Healthy breakfast: रात्री उरलेल्या चपात्यांपासून बनवा चुरमा, झटपट तयार होईल नाश्ता!

Healthy breakfast: रात्री उरलेल्या चपात्यांपासून बनवा चुरमा, झटपट तयार होईल नाश्ता!

Jan 12, 2024 09:51 AM IST

Roti Churma Recipe: काही वेळा रात्रीच्या जेवणातील चपात्या उरतात. या चपात्यांचा वापर करून तुम्ही हेल्दी नाश्ता तयार करू शकता.

Left Over Roti Recipe
Left Over Roti Recipe (Priya's Lovely Kitchen)

Chapaticha Chivada Recipe: अनेकदा रात्री जेवण्यासाठी बनवलेल्या चपात्या उरतात. या चपात्या आपण फेकून देऊन अन्नाचा अपमान करू शकत नाही. मग अशावेळी काय करायचं समजत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही या चपतींचा वापर करू शकता. उरलेल्या चपातीपासून तुम्ही विविध पदार्थ बनवून खाऊ शकता. हिवाळ्यात या चपात्या खराब होण्याची काळजी करण्याची गरज नाही. हिवाळ्याच्या सकाळच्या उरलेल्या चपातीसोबत तुम्ही हटके रेसिपी ट्राय करून पाहू शकता. यामध्ये तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. तुम्ही चपातीपासून चुरमा बनवा. चुरमा बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. चला जाणून घेऊयात साहित्य आणि कृती..

दोन प्रकारचे आहेत चुरमा

तुम्ही गोड आणि दुसरा मसालेदार चुरमा बनवू शकता.

मसालेदार चुरमाची रेसिपी

ही डिश बनवण्यासाठी गरम पाणी उकळवा आणि त्यात बारीक चिरलेल्या भाज्या घाला आणि शिजवा. सर्व मसाले थोडे थोडे घालून मीठ घाला. नंतर ब्रेड फोडून त्यात घाला. आता शिजू द्या आणि त्यात थोडी कोथिंबीर घाला. एक उकळी आणा आणि नंतर पूर्णपणे शिजू द्या. यानंतर त्यात तूप घालून थोडे कोरडे होऊ द्या. चुरमासारखे दिसू लागल्यावर गॅस बंद करून सर्व्ह करा.

गोड चुरमाची रेसिपी

प्रथम कढई गरम करून त्यात तूप घाला. नंतर शिळ्या चपात्याचे तुकडे करून परतून घ्या. नंतर ते बाहेर काढून आणखी थोडं तूप घाला. नंतर त्यात आणखी थोडा गूळ घालून गुळाचा सरबत होऊ द्या. नंतर त्यात शिळ्या चपाती टाका आणि वरून ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड बारीक करून मिक्स करा. मग हा चुरमा सर्व्ह करा.

विभाग