Chocolate Fudge Recipe: अनेक लोकांना जेवणानंतर गोड पदार्थ खायला हवे असतात. नेहमीचे स्वीट डिश खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही चॉकलेट फडची रेसिपी ट्राय करू शकता. असे म्हटले जाते की एका मिठाईवाल्याने कॅरामल बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु या दरम्यान त्याने चुकून फज तयार केला. तुम्ही कँडी, नट्स किंवा स्प्रिंकल्सचे काही तुकडे घालून फजचा आनंद घेऊ शकता. घरी चॉकलेट फज बनवणे सोपे आहे. पाहा ही रेसिपी.
- २ कप अर्धी गोड चॉकलेट चिप्स
- १ कप गोड कंडेन्स्ड मिल्क
- १ चमचा व्हॅनिला एसेन्स
- १ कप चिरलेले अक्रोड
प्रथम बेकिंग डिश कागदाने गुंडाळून किंवा लोणी लावून तयार करा. आता मायक्रोवेव्ह-सेफ बाऊलमध्ये चॉकलेट चिप्स आणि गोड कन्डेन्स्ड मिल्क एकत्र करा. नंतर हे मिश्रण ३० सेकंदाच्या अंतराने मायक्रोवेव्ह करा. काही वेळाने चॉकलेट चिप्स पूर्णपणे वितळून मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत चांगले मिक्स करा. आता त्यात व्हॅनिला एसेन्स आणि अक्रोड घाला. तयार बेकिंग डिशमध्ये फज मिश्रण घाला आणि समान पसरवा. फज रुम टेम्परेचरवर सुमारे २ तास किंवा कडक होईपर्यंत थंड होऊ द्या. हे लवकर थंड करायचं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्येही ठेवू शकता.
फज कडक झाल्यावर बेकिंग डिशमधून काढून त्याचे छोटे तुकडे करून सर्व्ह करावे. फज खोलीच्या तापमानावर किंवा फ्रीजमधील हवाबंद कंटेनरमध्ये साठवता येतो. त्यात वेगवेगळे ड्राय फ्रूट्स घालू शकता.
संबंधित बातम्या