Microwave Chocolate Brownie Recipe: लहान मुले रोज काहीतरी वेगळं खाण्याचा हट्ट करतात. गोड खाण्याकडे तर त्यांचा फार कल असतो. चॉकलेट आणि त्यापासून बनवलेल्या गोष्टी मुलांना नेहमीच आवडतात. अनेक मोठ्या लोकांनाही चॉकलेट आवडते. याचमुळे रात्रीच्या जेवणानंतर मिठाईसाठी चॉकलेट ब्राउनी बनवू शकता. जेव्हा तुम्हाला गोड मिठाई सारखं खावेसे वाटते तेव्हा तुम्ही पटकन घरी ब्राउनीज तयार करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही आणि वेळही वाया घालवावा लागणार नाही, ही चविष्ट ब्राउनी फक्त ५ मिनिटांत तयार होईल. हे तुम्ही आइस्क्रीम किंवा हॉट चॉकलेटसोबत खाऊ शकता. चॉकलेट ब्राउनी बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
मेल्ट केलेलं चॉकलेट, २ चमचे मेल्ट केलेलं बटर, चवीनुसार पिठीसाखर, १ वाटी मैदा, १ कप दूध, ३-४ बारीक चिरलेले अक्रोड, काही चोको चिप्स
सर्व प्रथम, एका भांड्यात मेल्ट केलेलं चॉकलेट, साखर, मैदा, दूध आणि बारीक चिरलेला अक्रोड एकत्र करा.
आपल्याला सर्वकाही चांगले मिसळावे लागेल जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाही.
एक बेकिंग ट्रे किंवा कप घ्या आणि त्यात बटर पेपर पसरवा. त्यावर तयार केलेले पीठ घाला आणि वर काही चोको चिप्स घाला.
७५ सेकंद ओव्हनमध्ये ब्राउनीज ठेवा. टेस्टी वॉलनट चॉकलेट ब्राउनी तयार आहे.
ते एका प्लेटमध्ये काढा आणि वर थोडे गरम चॉकलेट घाला.
तुम्हाला हवे असल्यास या ब्राउनीच्या वर थोडं व्हॅनिला आइस्क्रीम टाका आणि वर चॉकलेट सिरप घाला.
खूप मऊ आणि झटपट ब्राउनी तयार आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या