Chocolate Laddu: घरी बनवा चॉकलेट आणि नारळाचे लाडू, मुलांना आवडेल ही टेस्टी रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chocolate Laddu: घरी बनवा चॉकलेट आणि नारळाचे लाडू, मुलांना आवडेल ही टेस्टी रेसिपी

Chocolate Laddu: घरी बनवा चॉकलेट आणि नारळाचे लाडू, मुलांना आवडेल ही टेस्टी रेसिपी

Published Nov 10, 2023 11:32 PM IST

Diwali Sweets Recipe: दिवाळीसाठी पारंपारिक बेसन आणि रव्याचे लाडू तुम्ही बनवले असतील. पण यावर्षी चॉकलेटच्या लाडूची ही रेसिपी ट्राय करा. लहान मुलांसोबत मोठ्यांना सुद्धा आवडतील.

चॉकलेट आणि नारळाचे लाडू
चॉकलेट आणि नारळाचे लाडू (freepik)

Chocolate and Coconut laddu Recipe: लहान मुले असो वा मोठे चॉकलेट खायला सगळ्यांनाच आवडते. मुले अनेकदा चॉकलेटची मागणी करतात. त्यांना इतर कोणत्याही प्रकारची मिठाई दिली तर ती खायला आवडत नाही. पण यावेळी हवं तर सणाच्या निमित्ताने मुलांच्या आवडीचे चॉकलेट लाडू बनवू शकता. ते ही नारळाच्या लाडूंसोबत. हे बनवणे खूप सोपे आहे आणि पटकन बनवता येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लाडू फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट आणि नारळाचे लाडू कसे बनवायचे.

चॉकलेट आणि नारळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य

- १ कप कंडेन्स्ड मिल्क

- १ कप ताजे किसलेले नारळ

- बारीक चिरलेले काजू आणि बदाम

- चॉकलेट सिरप

चॉकलेट आणि नारळाचे लाडू बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एक जड तळाचे भांडे घ्या. त्यात ताजे किसलेले खोबरे घालून मंद आचेवर भाजून घ्या. तसेच कंडेन्स्ड मिल्क घालून मिक्स करा. दोन्ही गोष्टी नीट मिसळा. आता त्यात बारीक चिरलेले काजू, बदाम आणि तुमचे आवडते इतर ड्राय फ्रुट्स टाका. आता हे मिश्रण चांगले एकजीव करून भाजून घ्या. नीट भाजून झाल्यावर गॅस बंद करा. आता हे मिश्रण हाताने स्पर्श करता येईल इतके थंड झाले की नंतर ते प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर आता थोडेसे मिश्रण तळहातावर घेऊन गोल आकार द्या. त्याला थोडं चपटा करून मधोमध थोडे चॉकलेट सिरप टाका. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात चॉकलेटचे छोटे तुकडे सुद्धा आत ठेवू शकता. या चॉकलेटला सर्व बाजूंनी नीट बंद करून घ्या. 

तळहातांच्या साहाय्याने त्याला गुळगुळीत गोल आकार द्या. जेणेकरून हे लाडू सुंदर दिसतात. तुम्हाला हवे असल्यास हे लाडू तुम्ही सुक्या खोबऱ्याने कोट सुद्धा करू शकता. हे छान दिसतील. तुमचे चॉकलेट आणि नारळाचे लाडू तयार आहेत.

Whats_app_banner