मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chinese Chilli Singhada: चटपटीत खायचे असेल तर बनवा चिली शिंगाडा, सर्वांना आवडेल ही रेसिपी

Chinese Chilli Singhada: चटपटीत खायचे असेल तर बनवा चिली शिंगाडा, सर्वांना आवडेल ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 28, 2023 06:26 PM IST

Snacks Recipe: संध्याकाळी स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. चायनीज चिली शिंगाड्याची ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

चिली शिंगाडा
चिली शिंगाडा (Freepik)

Chinese Chilli Singhada Recipe: शिंगाडा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे कच्चे, भाजलेले किंवा उकडून खाल्ले जातात. जर तुम्हाला काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर तुम्ही हे चायनीज चिली शिंगाड्याची रेसिपी बनवू शकता. यात भरपूर भाज्या वापरल्या गेल्या आहेत. हा चविष्ट नाश्ता तुम्ही संध्याकाळी केव्हाही तयार करू शकता. घरातील लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हे खूप आवडेल. चला जाणून घ्या चायनीज चिली शिंगाड्याची रेसिपी कशी बनवायची.

चिली शिंगाडा बनवण्यासाठी साहित्य

- ३०० ग्रॅम शिंगाडा (उकडलेले)

- ५ ते ८ काजू

- १ चमचा कॉर्न फ्लोअरमध्ये २ चमचे पाणी मिक्स केलेले

- १ कप शिमला मिरची

- २ हिरवे कांदे

- १ टीस्पून चिरलेला लसूण

- २ हिरव्या मिरच्या

- १ टीस्पून किसलेले आले

- १ कांदा

- १ टीस्पून चिरलेली कोथिंबीर

- १ टीस्पून शेझवान सॉस

- २ चमचे सोया सॉस

- १/४ कप पाणी

- २ चमचे तेल

- मिरपूड चवीनुसार

- गार्निशसाठी तीळ

- मीठ चवीनुसार

चिली शिंगाडा बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी आधी शिंगाड्याचे साल काढून वाफवून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून त्यात काजू तळून घ्या. आता उरलेल्या तेलात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले आणि लसूण घालून परतून घ्या. नंतर कांदा आणि मीठ घाला आता शेझवान सॉस, हिरवी पिवळी आणि लाल सिमला मिरची घाला. आता हे मिक्स करा आणि नंतर चिरलेली कोथिंबीर घाला. चांगले मिक्स करा आणि नंतर थोडे पाणी घाला. आता त्यात कॉर्नफ्लोअरची स्लरी घाला. चांगले मिक्स करा आणि नंतर शिंगाडे घाला. हे सर्व मिक्स करा. शेवटी हिरवा कांदा, काजू टाका आणि नंतर तीळने सजवा आणि सर्व्ह करा.

विभाग