Chicken Biryani Recipe: आज म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी देशभरात ईद ए मिलाद साजरा केला जात आहे. या दिवशी लोक विविध प्रकारचे व्यंजन बनवून सण साजरा करतात. तुम्हाला सुद्धा काहीतरी खास बनवायचे असेल तर तुम्ही चिकन बिर्याणीची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी तुमच्या रात्रीच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची चिकन बिर्याणी
- १/२ किलो चिकन
- १/२ कप दही
- २५ ग्रॅम कोथिंबीर
- २५ ग्रॅम पुदिना
- १० ग्रॅम कढीपत्ता
- १/२ टीस्पून जिरे
- १ टीस्पून धने
- १/२ टीस्पून बडीशेप
- २५ ग्रॅम हिरवी मिरची कापलेली
- २० ग्रॅम लसूण
- २ चमचे आले
- १/२ टीस्पून हळद
- १ टीस्पून लिंबाचा रस
- १ टीस्पून खसखस पेस्ट
- २५० ग्रॅम तांदूळ
- १ कांदा चिरलेला
- १ टेबलस्पून तूप
- ५-६ दालचिनीचे तुकडे
- १ तमालपत्र
- ४-५ वेलची
- ४-५ कढीपत्ता
- ४-५ लवंग
- १/२ लिटर
- २ टेबलस्पून तूप
- ५-६ दालचिनीचे तुकडे
- १ तमालपत्र
- ४-५ लवंग
- ४-५ वेलची
- १ जायफळ
- १०० ग्रॅम कांदा
- १ मध्यम टोमॅटो
चिकन बिर्याणीचे मिश्रण तयार करण्यासाठी दही, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, जिरे, धने, बडीशेप पावडर, हिरवी मिरची, लसूण, आले, हळद, लिंबाचा रस आणि खसखस पेस्ट घालून मिक्स करा. यात चिकनचे तुकडे मिक्स करून हे अर्धा तास बाजूला ठेवा.
हे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात दालचिनी, तमालपत्र, वेलची, कढीपत्ता आणि लवंग घाला. त्यानंतर चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. तांदूळ धुवून हे पाण्यासोबत शिजवा. पाणी उकळल्यावर तांदूळ हलक्या आचेवर झाकून साधारण १५ मिनिटे शिजवावा.
प्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात दालचिनी, तमालपत्र, जायफळ, लवंग आणि वेलची घालावे. नंतर कांदा घालून परतून घ्यावे. यानंतर टोमॅटो घालून तयार चिकनचे मिश्रण घालावे. आता कढई झाकून मंद आचेवर चिकन १० मिनिटे शिजवावे. ग्रेव्ही घट्ट झाल्यानंतर एका बाऊलमध्ये एक थर भाताची आणि एक थर तयार चिकनचा घाला. त्याचप्रमाणे चार ते पाच थर तयार करावेत. आता बिर्याणीवर उकडलेले अंडे चार भागांत कापून काजू आणि मनुकाने सजवावे.