Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Published May 16, 2024 10:10 PM IST

Chhattisgarh Special Recipe: दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नेहमीची भाजी आणि वरण खाण्याचा कंटाळा आला असेल तर उडदाची डाळ आणि बेसनाची कढी बनवा. छत्तीसगडच्या प्रसिद्ध कढीची ही रेसिपी ट्राय करा.

छत्तीसगडची प्रसिद्ध कढीची रेसिपी
छत्तीसगडची प्रसिद्ध कढीची रेसिपी

Urad Besan Kadhi Recipe: कढी ही अनेकांची आवडती असते. दही आणि बेसनापासून बनवलेल्या कढी तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पंजाबी ते राजस्थानी कढी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण यावेळी बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी. जे बनवायला सोपे आहे आणि चवीला अप्रतिम आहे. त्यामुळे जर तुम्हाला देसी खाद्यपदार्थ आवडत असतील आणि चव आवडत असेल, तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात छत्तीसगडची प्रसिद्ध उडीद डाळ आणि बेसनची कढी नक्की करून पहा. ही खायला खूप टेस्टी आणि बनवायला सोपी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही कढी नक्कीच आवडेल. चला तर जाणून घ्या झटपट बनणारी कढीची रेसिपी

कढी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- एक वाटी उडीद डाळ

- अर्धी वाटी बेसन

- अर्धी वाटी दही

- दोन ते तीन हिरव्या मिरच्या

- कढीपत्ता

- एक कांदा बारीक चिरलेला

- बारीक चिरलेला आले

- एक चमचा मोहरी

- एक तमालपत्र

- काळी मिरी

- हळद

- एक चिमूटभर हिंग

- मीठ चवीनुसार

कढी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम उडीद डाळ धुवून नीट भिजवून घ्या. साधारण तीन ते चार तास भिजवून ठेवल्यानंतर ते पाण्याबाहेर काढून धुवा आणि गाळून घ्या. आता एका कढईत तेल टाका. त्यात मोहरी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेले आले आणि हिरवी मिरची टाका. तसेच कढीपत्ता घाला. हे तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला परता. कांदे भाजताना एका भांड्यात बेसन घ्या. त्यात दही घालून फेटून घ्या. नंतर पाणी घालून पातळ द्रावण तयार करा. जेणेकरून कढी पूर्णपणे शिजवता येईल. या द्रावणात हिंग, चवीनुसार मीठ, हळद आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. आता कांदा परतून घेतल्यावर बेसनाचे हे द्रावण कढईत टाकून परतावे. उडीद डाळ बारीक करून घट्ट पेस्ट बनवा. डाळ बारीक करताना त्यात मीठ, हिंग, जिरे आणि लसूण टाका. तसेच आल्याचा एक इंच तुकडा घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता ही पेस्ट चमच्याने किंवा हाताच्या मदतीने उकळत्या कढीमध्ये लहान आकाराच्या गोळ्यांमध्ये टाका. त्याचा आकार लहान भज्यासारखा असावा याची खात्री करा. जास्त मोठे गोळे टाकू नका. 

उकळत्या कढीमध्ये सर्व पेस्टचे पकोडे टाकल्यानंतर मंद आचेवर झाकून ठेवा. जेणेकरून सर्व पकोडे शिजतील. शिजल्यावर गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करा.

Whats_app_banner