Rice Chilla Recipe: थंडीच्या दिवसात गरमागरम नाश्ता सर्वांनाच आवडतो. मात्र ज्या लोकांना रोज काहीतरी नवीन खायला आवडते त्यांना रोज नाश्त्यात काय बनवायचे हा प्रश्न पडतो. तुम्हालाही रोज काहीतरी नवीन आणि टेस्टी खावेसे वाटत असेल तर तुम्ही छत्तीसगडचा प्रसिद्ध तांदळाचा चीला बनवू शकता. हा चीला बनवायला खूप सोपा आहे आणि झटपट तयार होतो. कोथिंबिरी आणि टोमॅटोच्या चटणीसोबत खाल्ल्यास याची चव अप्रतिम लागते. चला तर मग जाणून घ्या कसा बनवायचा तांदळाचा चीला
- तांदळाचे पीठ
- गाजर
- कांदा
- कोथिंबीर
- हिरवी मिरची
- मीठ
- तूप
तांदळाचा चीला बनवण्यासाठी प्रथम भाज्या नीट धुवून घ्या. नंतर गाजर आणि कांदे सोलून घ्या. गाजर किसून घ्या आणि कांद्याचे बारीक तुकडे करा. नंतर कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. आता एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात कोरडे चिरलेले गाजर, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ टाकून मिक्स करा. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. तांदुळाच्या चीलासाठी तुम्हाला पातळ पीठ तयार करावे लागते. हे बॅटर तयार झाल्यावर तवा गरम करा. आता गरम तव्यावर बॅटर टाकून चीला तयार करा. चीलावर आवश्यकतेनुसार तूप लावावे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. चीला दोन्ही बाजूंनी नीट पलटी करून भाजून घ्या. तुमचा तांदळाचा चीला तयार आहे. कोथिंबीर आणि टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व्ह करा.