मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sandwich Recipe: मुलांसाठी झटपट बनवा चीज ग्रील्ड सँडविच, इव्हनिंग स्नॅक्स साठी परफेक्ट आहे रेसिपी

Sandwich Recipe: मुलांसाठी झटपट बनवा चीज ग्रील्ड सँडविच, इव्हनिंग स्नॅक्स साठी परफेक्ट आहे रेसिपी

Jun 01, 2024 07:21 PM IST

Evening Snacks Recipe: मुलांना संध्याकाळी काहीतरी चटपटीत स्नॅक्स खायला आवडते. तुम्ही यावेळी चीज ग्रील्ड सँडविचची ही रेसिपी ट्राय करू शकता.

चीज ग्रील्ड सँडविचची रेसिपी
चीज ग्रील्ड सँडविचची रेसिपी (unsplash)

Cheese Grilled Sandwich Recipe: संध्याकाळी भूक लागल्यानंतर मुलांना रोज काहीतरी वेगळा पदार्थ हवा असतो. त्यातही सँडविच, बर्गर सारखे स्नॅक्स त्यांच्या आवडीचे असतात. रोज संध्याकाळी मुलांसाठी काय वेगळं बनवायचं असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही मुलांसाठी झटपट चीज ग्रील्ड सँडविच बनवू शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते. लहान मुलांसोबतच हे मोठ्यांना सुद्धा आवडेल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे चीज ग्रील्ड सँडविच.

ट्रेंडिंग न्यूज

चीट ग्रील्ड सँडविच बनवण्यासाठी साहित्य

- ब्रेड ४ स्लाइस

- बटर १/२ टीस्पून

- चीज २ चमचे

- टोमॅटो १ चिरलेला

- कांदा १ चिरलेला

- बटाटा १ उकळलेला

- काकडी १ चिरलेली

- काळी मिरी पावडर १/२ टीस्पून

- चाट मसाला १/२ टीस्पून

- कोथिंबीर १ टीस्पून

- मीठ चवीनुसार

चीज ग्रील्ड सँडविच बनवण्याची पद्धत

मुलांसाठी चीज ग्रील्ड सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्रेडवर चीज लावा. मुलांना आवडत असेल तर तुम्ही चीज लावण्यापूर्वी हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस सुद्धा लावू शकता. आता त्यावर त्यावर कांदा, टोमॅटो, काकडी, बटाट्याचे स्लाईल ठेवा. यावर थोडे मीठ, काळी मिरी पावडर, चाट मसाला शिंपडा. आता दुसऱ्या ब्रेड स्लाईसवर चीज, हिरवी चटणी, सॉस लावून ही स्लाईस त्यावर ठेवा. आता सँडविच ग्रील गरम करा. आता ब्रेडवर बटर लावून सँडविच ग्रीलमध्ये ठेवा. आता सँडविच दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ग्रील करा. तुमचे टेस्टी चीज ग्रील्ड सँडविच तयार आहे. टोमॅटो सॉससोबत गरमा गरम सँडविच मुलांना सर्व्ह करा.

WhatsApp channel